15 December 2024 12:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Bridal Night Cream | महागडी क्रीम विसरा, घरीच बनवा तांदळापासून तयार होणारी नाईट क्रीम, मिळेल ब्रायडल ग्लो - Marathi News

Highlights:

  • Bridal Night Cream
  • अशी तयार करा ब्रायडल ग्लो नाईट क्रीम :
  • क्रीमचे फायदे :
  • महत्त्वाचं :
Bridal Night Cream

Bridal Night Cream | बऱ्याच महिला डे क्रीम, नाईट क्रीम अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या क्रीम वापरत असतात. काहीजणी डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर होण्यासाठी नाईट क्रीम वापरतात तर, काही महिला चेहऱ्यावरील डार्क स्पॉट्स जाण्यासाठी नाईट क्रीमचा वापर करतात. परंतु नाईट क्रीमची कॉन्टिटी फारच कमी असते आणि किंमत महागडी असते. त्यामुळे या नाईट क्रीम प्रत्येकालाच परवडत नाहीत.

आज आम्ही तुम्हाला एका अशा नाईट क्रीम बद्दल सांगणार आहोत ज्या क्रीमचा वापर करून तुम्ही चक्क ब्रायडल ग्लो मिळवू शकता. ही नाईट क्रीम तुम्हाला घरच्या घरीच तयार करायची आहे. यासाठी तुम्हाला तांदुळाचा वापर करावा लागणार आहे. चला तर पाहूया तांदुळापासून बनणारी ब्रायडल ग्लो नाईट क्रीम.

अशी तयार करा ब्रायडल ग्लो नाईट क्रीम :

ब्रायडल ग्लो नाईट क्रीम तयार करण्यासाठी तुम्हाला दोन चमचे तांदूळ लागणार आहेत. सर्वप्रथम दोन चमचे तांदूळ एक वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर पाणी गाळून त्यामध्ये गुलाबाचं पाणी तांदूळ बुडेपर्यंत ओता. पुढे दोन तास गुलाब पाणीमध्ये तांदूळ भिजत ठेवा. पूर्ण दोन तास झाल्यानंतर तांदुळाचा अर्क गुलाबाच्या पाण्यात उतरेल. गुलाबाचं पाणी पूर्णपणे पांढरं दिसू लागेल. त्या पाण्यामध्ये तुम्हाला दोन चमचे एलोवेरा जेल मिक्स करायचं आहे. त्यानंतर एक चमचा नारळाचं तेल आणि एक चमचा कच्च दूध देखील मिसळवायचं आहे. हे संपूर्ण मिश्रण एकत्रित करून पातळ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या मिश्रणात एक विटामिन ई कैप्सूल देखील पिळून टाकू शकता.

क्रीमचे फायदे :

1) कोरफड ही सौंदर्याची जीवनदानी आहे. त्यामुळे तुम्ही या क्रीममध्ये कोरफडीचा जेल मिक्स केला असल्यास तुमच्या चेहऱ्यावरील संपूर्ण काळे डाग नाहीसे होण्यास मदत होईल.

2) कच्च दूध आणि नारळाच्या तेलामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चकाकी येईल. त्याचबरोबर चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या देखील हळूहळू कमी होऊ लागतील. म्हणजेच ही क्रीम अँटी एजिंगचे काम देखील करते.

3) तुमच्या चेहऱ्यावर फोडांचे काळे डाग अथवा राखाडी,भुरके डाग असतील तर या नाईट क्रीममुळे चेहऱ्यावरील सर्व डाग निघून जातील आणि चेहरा पाण्यासारखा ट्रान्सफरंट दिसण्यात मदत होईल.

4) या क्रीमच्या वापराने तुमचा चेहरा कोरियन महिलांसारखा दिसू लागेल. म्हणजेच तुमची ग्लास असतील दिसेल.

महत्त्वाचं :

ब्रायडल ग्लो नाइट क्रीम तुम्हाला दररोज रात्री झोपल्यानंतर किंवा सकाळी फेसवॉश केल्यानंतर चेहऱ्यावर अप्लाय करायची आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रीम स्टोअर करण्यासाठी काचेची छोटी डबी वापरायची आहे. ही डबी तुम्ही फ्रिजमध्ये देखील ठेवू शकता.

Latest Marathi News | Bridal Night Cream 26 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bridal Night Cream(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x