1 May 2025 10:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN
x

Multani Mitti Face Pack | तुमचा 'हा' स्किन टाईप असल्यास कधीही मुलतानी मातीचा वापर करू नका, तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News

Multani Mitti Face Pack

Multani Mitti Face Pack | मुलतानी माती चेहऱ्याला लावणं प्रत्येक महिलेला आवडतं. अगदी आई आणि आजीच्या काळापासून चेहऱ्याला सुंदर बनवण्यासाठी वापरला जाणारं प्रॉडक्ट किंवा सौंदर्यप्रसाधन म्हणजे मुलतानी माती. चेहरा अतीप्रमाणात काळवंडला की, मुलतानी माती वाटीमध्ये घेऊन पाण्यामध्ये खलवून चेहऱ्याला लावून घ्यायची. जुन्या काळातील अनेक महिला अजून देखील मुलतानी मातीचा वापर करतात. परंतु प्रत्येक स्कीन टाईपला मुलतानी माती सूट होते का? जाणून घ्या ब्युटी एक्सपर्ट काय सांगतायत.

मुलतानी माती सर्व त्वचेच्या प्रकारांसाठी आहे का?
ब्युटी एक्सपर्ट नेहा खुराना यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलेल्या माहितीप्रमाणे मुलतानी माती चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. परंतु प्रत्येकाची त्वचा वेगवेगळी असते त्यामुळे प्रॉडक्ट वापरताना देखील वेगवेगळच वापरलं पाहिजे. असं त्यांचं म्हणणं आहे.

या स्किन टाईप असलेल्या व्यक्तींनी मुलतानी मातीचा वापर टाळला पाहिजे

1) डॉक्टर नेहा यांच्या म्हणण्यानुसार सेन्सिटिव्ह त्वचा असलेल्या व्यक्तींनी चुकून सुद्धा मुलतानी मातीचा वापर केला नाही पाहिजे. सेन्सिटिव्ह त्याच्या आधीपासूनच नाजूक असते त्यामुळे मुलतानी मातीचा वापर करणे टाळलं पाहिजे. नाहीतर चेहऱ्यावर जास्त प्रमाणात डलनेस येऊ शकतो.

2) नॉर्मल स्किन टाईप असलेल्या व्यक्तींनी देखील वारंवार मुलतानी मातीचा वापर केला की, चेहरा सुरकुतू शकतो. चेहरा प्रचंड प्रमाणात कोरडा पडून विखुरल्यासारखा दिसू शकतो.

3) ड्राय त्वचेच्या व्यक्तींनी मुलतानी मातीपासून चार हात लांबच राहिलं पाहिजे. जर कोरड्या त्वचेच्या व्यक्तींनी मुलतानी मातीचा लेप चेहऱ्याला लावला तर, चेहरा आणखीन तडे पडल्यासारखा दिसू लागेल.

गरजेपुरता प्रॉडक्ट वापरा :
बऱ्याचदा गरजेपुरतं प्रॉडक्ट वापरणे गरजेचे असते. तुमच्या चेहऱ्याला जेवढी मुलतानी माती आवश्यक आहे तेवढीच मुलतानी माती लावा. कारण की, गरजेपेक्षा जास्त प्रॉडक्ट वापरलं तर, त्याचा विपरीत परिणाम तुम्हाला भोगावा लागू शकतो.

Latest Marathi News | Multani Mitti Face Pack 11 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multani Mitti Face Pack(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या