2 May 2025 12:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल
x

ऑनलाईन बँकिंग विश्वात आता 'व्हॉट्सअँप पे' सुद्धा येणार.

whatsapp, Online Payment, Digital Payment System, RBI Guidelines, PhonePe, PayTM, Rupay, Google Online Payment

मुंबई : सध्याच्या काळात प्रत्येकाला सर्वच गोष्टी अगदी बसल्या जागी करायच्या असतात. त्यातच आता बँकिंग सेवा सुद्धा मागे राहिलेली नाही. ऑनलाईन बँकिंगमूळे हल्ली पैशाचा व्यवहार अगदी सहज सोपा झाला आहे. एखाद्या व्यक्तीला पैसे पोहोचवण्यासाठी त्या व्यक्तीला भेटायला हवेच असे नाही. हे पैसे पोहोचवण्यासाठी आपल्या मोबाईल वर विविध अँप उपलब्ध आहेत. या अँपद्वारे आपण हव्या त्या वेळी हव्या त्या व्यक्तीशी व्यवहार करू शकतो.

त्यातच व्हॉट्सअँप हे जगातील सर्वात लोकप्रिय असे इन्स्टंट मेसेजिंग अँप आहे. बाकी सगळ्या अँप च्या तुलनेत जगात व्हॉट्सअँप वापरणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे. नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात व्हॉट्सअँप’चे ग्लोबल हेड विल कॅथकार्ट आणि नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत उपस्तित होते. या कार्यक्रमात व्हॉट्सअँप च्या कामगिरीबद्दल चर्चा करण्यात आली. याशिवाय व्हॉट्सअँपच्या व्यवसाय कामगिरीबद्दल सांगण्यात आले. भारतात लहान लहान व्यवसाय व्हॉट्सअँपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहेत.

कित्येक लोक आपल्या व्यवसायाचा प्रचार व्हॉट्सअँपद्वारे करत आहेत. याच सगळ्या गोष्टी व व्हॉट्सअँपचा लोकांमधील वाढता वापर लक्षात घेऊन व्हॉट्सअँप चे ग्लोबल हेड विल कॅथकार्ट यांनी आता व्हॉट्सअँप पेमेंट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षाअखेरीस व्हॉट्सअँप पे लोकांच्या भेटीला येणार असल्याचा त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता व्यवहार करणे आणखी सोपे व सोईचे जाणार आहे. हे अँप बाकी अँपच्या तुलनेत सुरक्षित देखील असण्याचा सांगितलं जातंय.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#gadgets(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या