1 May 2025 6:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL
x

OnePlus 9 Pro 5G | वनप्लसचा 9 Pro 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदीची संधी, तब्बल 24 हजार रुपयांनी स्वस्त मिळतोय, ऑफर पहा

Highlights:

  • OnePlus 9 Pro 5G
  • बँक ऑफर्ससह फोनवर एकूण 24,450 रुपयांपर्यंत सूट
  • फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
  • एलईडी फ्लॅशसह चार कॅमेरे
  • बॅटरी 65T वार्प चार्जिंगसह
OnePlus 9 Pro 5G

OnePlus 9 Pro 5G | जर तुम्ही उत्तम कॅमेरा आणि दमदार परफॉर्मन्स असलेला 5जी फोन घेण्याचा विचार करत असाल तर अॅमेझॉनवर तुमच्यासाठी दमदार ऑफर आहे. या ऑफरमध्ये तुम्ही वनप्लसचा धांसू स्मार्टफोन वनप्लस 9 प्रो 5 जी एमआरपीवरून अत्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकता. १२ जीबी रॅम असलेल्या या फोनची एमआरपी 69,999 रुपये आहे. सेलमध्ये डिस्काउंट नंतर तुम्ही 54,999 रुपयांमध्ये ऑर्डर करू शकता.

बँक ऑफर्ससह फोनवर एकूण 24,450 रुपयांपर्यंत सूट

बँक ऑफरमध्ये हा फोन 1500 रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो. वनप्लसचा हा फोन तुम्ही 22,950 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनससह खरेदी करू शकता. एक्सचेंज आणि बँक ऑफर्ससह फोनवर एकूण सूट 24,450 रुपयांपर्यंत मिळते. लक्षात ठेवा की अतिरिक्त एक्सचेंज बोनस आपल्या जुन्या फोनच्या स्थिती आणि ब्रँडवर अवलंबून असेल.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

वनप्लस 9 प्रो 5 जी मध्ये एलपीडीडीआर 5 रॅम 12 जीबी पर्यंत आणि यूएफएस 3.1 स्टोरेज 256 जीबी पर्यंत आहे. यामध्ये कंपनी अॅड्रेनो 660 जीपीयूसह स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट देत आहे. फोनचा डिस्प्ले जबरदस्त आहे. हा डिस्प्ले 6.7 इंचाचा आहे, जो 3216×1440 पिक्सल रिझोल्यूशनसह येतो. हा एलटीपीओ फ्लुइड एमोलेड डिस्प्ले 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट आणि 20.1: 9 चा आस्पेक्ट रेशो सपोर्ट करतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी तुम्हाला गोरिल्ला ग्लास देखील मिळेल.

एलईडी फ्लॅशसह चार कॅमेरे

फोनच्या रियर पॅनेलवर एलईडी फ्लॅशसह चार कॅमेरे आहेत. यामध्ये ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर सह ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स चा समावेश आहे. सेल्फीसाठी कंपनी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. हा फोन 4500mAh क्षमतेच्या बॅटरीने सुसज्ज आहे.

बॅटरी 65T वार्प चार्जिंगसह

फोनमध्ये देण्यात आलेली ही बॅटरी 65T वार्प चार्जिंगसह येते. हा फोन ५० वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. ओएसबद्दल बोलायचे झाले तर हा फोन अँड्रॉइड ११ वर काम करतो. यात बायोमेट्रिक सिक्युरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ 5.2 आणि एनएफसी सारखे पर्याय मिळतील.

News Title : OnePlus 9 Pro 5G Price in India check details on 02 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#OnePlus 9 Pro 5G(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या