12 August 2020 12:22 PM
अँप डाउनलोड

बाजारात जिओ'चा नवीन फोन येणार

Jio, Jio Internet, Jio Reliance, Reliance Jio Mobile

मुंबई : जिओ कंपनी कायमच ग्राहकांना नवनवीन ऑफर्स देत खुश करत असते. या कंपनीच्या बाजारात येण्यामुळे कॉलिंग आणि इंटरनेटचा वापर माफक दरात करता येऊ लागला. अशातच जिओ कंपनी आपला नवीन फोन आता बाजारात लॉन्च करण्यास सज्ज झाली आहे. या फोन मध्ये मीडिया टेक चिपसेट असणार आहे. रिलायन्स रिटेलच्या ४जी फोनची घटती मागणी लक्षात घेत कंपनीने नवा फोन लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

या फोन च्या प्रकल्पावर सध्या काम चाली असल्याच कळतंय. लवकरच ग्राहकांना हा फोन पाहता येणार आहे. टेलिकॉम काम्प्सनयसनसोबत या फोन वर जिओ सध्या काम करत आहे. एप्रिल ते जुन या तिमाहीत भारताच्या फिचर फोन बाजारपेठेत जिओ फोनच्या भागीदारीत घट होऊन २८ टक्के इतकी झाली आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण ४७ टक्के इतके होत. जिओ फोन च्या मागणीत सध्या घट होत असल्याचा निष्पन्न झाल्याने नव्या दमदार फोनसह बाजारात उतरण्याची तयारी जिओने केली आहे.

जिओच्या सगळ्याच ऑफर्स मध्यमवर्गीय ग्राहकांच्या खिशाला परवडतील अश्या असतात. दार वेळी एका धमाकेदार ऑफर सह इतर कंपन्यांना टक्कर द्यायला जिओ नेहमीच सज्ज असते. या फोन मध्ये जिओ आता काय नवीन घेऊन येणार व याची किंमत काय असेल याकडे आता ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#gadgets(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x