3 May 2025 7:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Health First | केसात चाई पडलीय? | ‘या’ घरगुती उपायांनी दिसाल पूर्वीसारखे - नक्की वाचा

Alopecia Areata home remedies

मुंबई, ०८ सप्टेंबर | डोक्यावरील काही भागातील केस गळून पडून ते पुन्हा न उगवल्यामुळे तेथे टकलासारखा तुळतुळीत भाग दिसतो त्याला ‘चाई’ असे म्हणतात. चाई काही वेळा आनुवंशिक असते, तर काही वेळा पौरूषजन (अँड्रोजेन) या हॉर्मोनामुळे (अंतःस्रावी ग्रंथीपासून निर्माण होणाऱ्या स्रावामुळे) हा विकार दिसतो असे मानण्यात येते. या समस्येला वैद्यकीय भाषेत अलोपेशिया एरेटा असे म्हणतात. चाईमुळे गेलेले केस हे अनेकदा आपोआपच पुन्हा उगवतात. म्हणजेच हा आजार आपोआप ९०% होऊ शकतो. दाढी, मिश्या, डोक्यातील केस आणि भुवयांमधील केस चाई जाऊ शकतात.

केसात चाई पडलीय?, ‘या’ घरगुती उपायांनी दिसाल पूर्वीसारखे – Alopecia Areata home remedies in Marathi :

चाईचे तीन प्रकार आढळतात:

* एखाद्या मर्यादित जागेचे केस जाणे,
* सर्वच केस जाणे आणि
* अनेक ठिकाणांचे केस कमीच उगवणे.

चाईमुळे केस जाण्याची पुढील कारणे आहेत. ज्यामुळे हि समस्या उद्भवू शकते:

* थायरॉईड
* मानसिक ताणतणाव
* त्वचेचं इन्फेक्शन
* रजोनिवृत्ती आणि गर्भधारणा
* हार्मोन्स असंतुलन
* आनुवंशिकता
* डायबेटिज
* आमवात

दाढी अथवा डोके येथील केस गळून पडल्याने तेथे वर्तुळाकार असे टक्कल दिसते त्याला ‘वर्तुळी अलोमता’ असे म्हणतात. त्याचे निश्चित कारण अज्ञात असले, तरी भावनिक संक्षोभामुळे हे होत असावे असे मानतात. केशमूलाच्या भोवती शोथ (दाहयुक्त सूज) आल्यामुळे तेथे अपपुष्टी (पोषक द्रव्यांची उणीव) उत्पन्न होते व त्यामुळे केसाला अन्नपुरवठा होत नसल्यामुळे केस गळून पडून पुन्हा उगवत नाहीत.

सामान्य विकारात गोल किंवा लंबगोल आकाराचे लहान लहान तुकतुकीत टक्कल दिसू लागते. त्याच्या भोवतालच्या जागेतील केस उद्गारचिन्हासारखे (!) टोकाशी जाड व मुळाशी बारीक असे दिसतात. सुरूवातीस गळून पडलेले केस पुन्हा उगवतात परंतु पुढे ही उगवण बंद पडते. एके ठिकाणी चाई उत्पन्न होत असता दुसऱ्या ठिकाणच्या चाईतील केस उगवू लागल्याचेही दिसते. तेथे नव्याने आलेले तुरळक केस बारीक, पांढरे अथवा पिंगट रंगाचे असतात.

निदान सोपे असले तरी त्वचेमध्ये झालेल्या कवकसंसर्गामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीच्या संसर्गामुळे) अशीच अलोमता दिसते; त्याचे व्यवच्छेदक (वेगळेपणा निश्चित करणारे) निदान करावे लागते. प्रौढ माणसात आघात (जखम, भाजणे, क्ष-किरण इ.), रासायनिक द्रव्ये, काही औषधे, कवकसंसर्ग, उपदंशाचे (गरमीचे) लक्षण म्हणून अथवा त्वचेच्या इतर विकारांमुळेही चाईसारखेच केस गेलेले दिसतात. जखम होऊन गेल्यानंतर तेथे जो वण राहतो त्या ठिकाणी केस येत नाहीत. त्या प्रकाराला ‘व्रणी अलोमता’ असे म्हणतात.

आयुर्वेदिक उपचार किंवा चिकित्सा:
* लिंबूरस, आले, कांदा आणि लसूण याचे ताजे मिश्रण
* जास्वंदीच्या फुलांचा आणि पानांचा समसमान भागाची पेस्ट करावी व त्यात खाण्याचा सोडा घालून चाईवर लावावे
* जयपाल बी किंवा जमालगोटा बी उगाळून चाईवर लावावे. हे बीज उष्ण असल्याने लावलेल्या जागेवर थोडीशी आग होऊ शकते.
* खोबरेल तेल आणि मोहरी वाटून हे मिश्रण एक दिवस मुरवत ठेवावे व त्यानंतर चाईवर लावावे.
* गुंजा बी सलग तीन दिवस उगाळून लावल्यानेही चांगला फरक पडतो.

Alopecia areata Causes symptoms and treatment :

तसेच दर आठवड्यातून एकदा जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) किरणांचा उपचार घेतल्यास त्याचा उपयोग होतो. शरीरात कोठे [उदा, दात, हिरड्या, गिलायू (टॉन्सिल्स), आंत्रपुच्छ (ॲपेंडिक्स) वगैरे ठिकाणी] चिरकारी (दीर्घकालीन) जंतुसंसर्ग असल्यास त्याच्यावर उपाय केल्यासही त्याचा उपयोग होतो. अलीकडे स्टेरॉइड औषधांचाही उपयोग करतात. त्याचप्रमाणे हिरव्या पालेभाज्या आणि मोड आलेली कडधान्ये, प्रथिनयुक्त आहार, ड्राय फ्रुट चा समवेत जर आपल्या दैनंदिन आहारात केला तर त्याचाही उपयोग चाई कमी होण्यासाठी किंवा नाहीशी होण्यासाठी होतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Alopecia Areata home remedies in Marathi.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या