14 December 2024 11:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Health Benefits of Coconut Water | नारळ पाणी पिण्याचे असे आहेत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा

Benefits, Drinking coconut water

मुंबई, २३ सप्टेंबर | नारळाचे पाणी हे आरोग्यदायी असल्याचे आपण सगळेच जाणतो. हे पाणी १००% शुद्ध असून त्यात ९४% पाणी असते. अगदी कमी कॅलरीज आणि शून्य टक्के कोलेस्ट्रॉल असल्याने हे एक नैसर्गिक आरोग्यदायी पेय आहे. तसंच त्यात व्हिटॅमिन बी, अमिनो असिड, सायटोकायनिन (cytokinins) आणि पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, मेगनिज यांसारखी मिनरल्स असतात. या काही आरोग्यदायी फायद्यांमुळे नारळाचे पाणी रोज घ्या. नारळाच्या पाण्याप्रमाणे नारळाचे दूध देखील अत्यंत गुणकारी आहे म्हणूनच जाणून घ्या;

नारळ पाणी पिण्याचे असे आहेत आरोग्यदायी फायदे – Benefits of drinking coconut water in Marathi :

हृदयाच्या आरोग्यासाठी:
फक्त तहान क्षमावण्यासाठी नाही तर नारळपाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. काही अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की नारळपाण्यामुळे हार्ट अटॅकचे प्रमाण कमी होते. तर दुसऱ्या अभ्यासानुसार नारळपाण्यात मुबलक प्रमाणात असलेल्या पोटॅशिअममुळे हायपरटेन्शनचा त्रास कमी होतो.

किडनी स्टोनचा धोका कमी होतो:
नियमित नारळपाणी घेतल्याने किडनी स्टोनचा धोका कमी होतो. त्यात असलेल्या पोटॅशिअम व मॅग्नेशिअममुळे लघवी साफ होण्यास मदत होते. त्याचबरोबर तुम्हाला किडनी स्टोन असल्यास लघवीसोबत स्टोन निघून जाण्यास मदत होईल.

डायरियावर गुणकारी:
डायरियामध्ये शरीरातील पाणी कमी होते. नारळपाण्यामुळे ती कमतरता भरून निघते त्याचबरोबर इलेक्ट्रोलाइट्स आणि मिनिरल्सची कमी देखील भागवली जाते. शरीरातील विषद्रव्ये शरीराबाहेर टाकली जातात. आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या इलेकट्रॉलेटचे प्रमाण यात असते.

हायड्रेट ठेवते:
उन्हाळयात सतत घाम आल्यामुळे शरीर डीहायड्रेट होते. त्यामुळे पोटाला थंडावा देणारे पदार्थ खावेसे वाटतात. अशावेळी नारळपाण्यासारखा दुसरा उत्तम पर्याय नाही. कारण यात कार्ब्स, साखर कमी प्रमाणात तर इलेक्टोलेट्स मुबलक प्रमाणात असतात. फक्त नारळपाणी प्या किंवा त्यात लिंबाचा रस घालून ही तुम्ही हे हेल्दी ड्रिंक घेऊ शकता.

The Health Benefits of Coconut Water :

The-Health-Benefits-of-Coconut-Water

व्यायाम करताना आणि करून झाल्यावर:
व्यायाम करताना हायड्रेट राहणे खूप गरजेचे आहे. नारळपाण्यात कोणत्याही प्रकारचे प्रेजर्वेटिव्हस किंवा कृत्रिम साखर नसल्यामुळे हे एक नैसर्गिक स्पोर्ट्स ड्रिंक आहे. त्यामुळे व्यायाम करताना आणि झाल्यानंतर हायड्रेट राहण्यास मदत होते. तसंच यात कमी कॅलरीज आणि पोटॅशिअम असते. आणि शरीरातील पाण्याची कमी भरून काढण्यास मदत करते.

त्वचा टवटवीत होते:
नारळपाण्यामुळे त्वचा मऊ मुलायम होते. त्वचेला नवा तजेला येतो. दिवसातून दोनदा नारळपाणी चेहरा, हाताला लावा आणि स्वतःच फरक बघा. त्यात असलेल्या cytokinins मुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या येत नाहीत.

प्रेग्नसीमधील काही समस्यांवर फायदेशीर:
नारळपाणी हे नैसर्गिकरित्या शुद्ध असते. म्हणून प्रेग्नसीमध्ये हे पाणी पिणे सुरक्षित असते. प्रेग्नसीमध्ये होणारी अ‍ॅसिडीटी, बद्धकोष्टता, छातीतील जळजळ यावर अत्यंत फायदेशीर ठरते.

तुटलेल्या दातांसाठी:
दात तुटल्यास डॉक्टरांकडे जाण्यापर्यंत दात त्याच्या जागी व्यवस्थित राहत नसल्यास नारळपाणी स्टोरेज सोल्युशन म्हणून वापरू शकता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News English Title: Benefits of drinking coconut water in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x