14 December 2024 4:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

कोवॅक्सिन, कोव्हिशिल्ड आणि झायडस कॅडिला लस | आपत्कालीन वापराला परवानगी

DCGI approves, Serum, Bharat Biotech vaccine

नवी दिल्ली, ०३ जानेवारी: मागील दहा महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाशी झुंजणाऱ्या देशवासियांसाठी दिलासादायक आणि मोठी बातमी आहे. अखेर भारताच्या औषध महानियंत्रक (डीसीजीआय)कडून कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींच्या आपत्कालीन वापराला आणि झायडस कॅडिला या लसीच्या तिसऱ्या ट्रायलला परवानगी देण्यात आली आहे. येत्या 6 जानेवारीपासून या लसीकरणास सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज डीसीजीआयची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत कोवॅक्सिन, कोव्हिशिल्ड आणि झायडस कॅडिला या तिन्ही लसींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या आठवडाभरातच फ्रंटलाईन वर्कर्सना ही लस टोचली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान करोनाची लस घेतल्यामुळे नपुंसकत्व येतं असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते आशुतोष सिन्हा यांनी केला आहे. याबाबत डीसीजीआयचे व्ही. जी. सोमानी यांना विचारलं असता, ”आम्ही कधीही अशा लसीला संमती देणार नाही जी नपुंसकत्व आणते. या दोन्ही लसी १०० टक्के सुरक्षित आहेत. लस घेतल्याने पुरुषांना नपुंसकत्व येतं असं म्हणणं साफ चुकीचं आहे. अशा मूर्खपणाच्या वक्तव्यांकडे लक्ष देऊ नये.” असं सोमानी यांनी स्पष्ट केलं.

 

News English Summary: This is comforting and big news for the countrymen who have been struggling with the Corona crisis for the last ten months. Finally, the Comptroller and Auditor General of India (DCGI) has approved the emergency use of two vaccines, Covacin and Covishield, and a third trial of the Zydus cadilla vaccine. The vaccination is expected to start on January 6. DCGI held a press conference today. At the press conference, it was announced that the three vaccines, Covacin, Covishield and Zydus Cadillac, would be allowed for emergency use. Sources said that the frontline workers will be vaccinated within this week.

News English Title: DCGI approves Serum Bharat Biotech vaccine for restricted news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x