15 December 2024 4:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Health First | काकडी-टोमॅटो एकत्र खाता का? | मग हे वाचाच

Eating, tomatoes and cucumbers, combination is unhealthy

मुंबई, १७ डिसेंबर: अनेकदा सलाडमध्ये काही लोक टोमॅटो आणि काकडी एकत्र खातात. खातांना ते चांगलंही वाटत असेल पण काकडी आणि टोमॅटो एकत्र खाणं नुकसानकारक ठरू शकतं याचा कधी विचार केलाय का? मुळात काकडी आणि टोमॅटोमध्ये इतके गुण असतात की, एकत्र खाल्ल्याने त्याचे आरोग्याला नुकसानही होऊ शकतात. Eating tomatoes and cucumbers combination is unhealthy says experts.

काकडी आणि टोमॅटो दोन्हींमुळे शरीराला अनेक फायदे होतात. पण एकत्र खाल तर याने पोटासंबंधी वेगवेगळे आजारही होऊ शकतात. काकडी आणि टोमॅटो एकत्र खाल्ल्याने गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, मळमळ होणे, थकवा आणि अपचन यांसारख्या समस्या होतात.

हेल्दी डाएटमध्ये अनेक लोक आहारात काकडी-टोमॅटो अशा एकत्रित सलाडचा समावेश करतात. अनेक जण टोमॅटो-काकडीची कोशिंबीर करुनही खातात. परंतु टोमॅटो काकडीच्या एकत्रित सेवनाने तब्येत बिघडण्याची शक्यता असू शकते. काकडी-टोमॅटोचं एकत्रित सेवन आरोग्यास योग्य नसल्याचं हेल्थ एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे.

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, काकडी आणि टोमॅटो यांच्या एकत्रित सेवनाने गॅस, पोटदुखी, थकवा, अपचन, मळमळ अशा समस्या होऊ शकतात. काकडी-टोमॅटो एकमेकांच्या विरुद्ध मानले जातात. या दोघांची पोटात पचण्याची वेळही वेग-वेगळी असते. त्यामुळे दोन्ही एकत्र खाण्याने समस्या निर्माण होऊ शकतात.

एक्सपर्ट्सनुसार, टोमॅटो आणि काकडी स्लो आणि फास्ट डायजेशनवाले पदार्थ आहेत. स्लो आणि फास्ट डायजेशन होणारे पदार्थ एकत्र खाल्याने, एक पदार्थ पचून इंटेस्टाईन अर्थात आतड्यांमध्ये पहिलं पोहचतं. तर दुसऱ्याची प्रोसेसिंग सुरु राहते. त्यामुळे या दोघांचं एकत्रित खाणं शरीरासाठी नुकसानदायक ठरु शकतं.

आरोग्य तज्ञांचं असं म्हणणं आहे की, काकडीमध्ये पौष्टिक तत्व असतात, जे शरीराला हायड्रेटेड ठेवतात. पण काकडीमध्ये एक असाही गुण आहे, जो सी व्हिटॅमिन शोषण्यात हस्तक्षेप करतो. त्यामुळे काकडी-टोमॅटो एकत्रित न खाण्याचा सल्ला दिला जातो. काकडी-टोमॅटो दोन्ही वेग-वेगळं खावं. एकाचा दुपारच्या तर दुसऱ्याचा रात्रीच्या जेवणात समावेश करु शकता. त्यामुळे दोन्हींचा शरीराला चांगला फायदा होईल.

 

News English Summary: Both cucumber and tomato have many benefits for the body. But if eaten together, it can also cause various stomach ailments. Eating cucumber and tomato together causes problems like gas, bloating, abdominal pain, nausea, fatigue and indigestion. Many people include a cucumber-tomato salad in their diet. Many people also eat tomato-cucumber salad. But combined consumption of tomatoes and cucumbers can lead to ill health. Health experts say that the combined consumption of cucumber and tomato is not good for health.

News English Title: Eating tomatoes and cucumbers combination is unhealthy says experts health article.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x