3 May 2025 7:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Health First | जाणून घ्या निलगिरी तेलाचे आरोग्यदायी फायदे

benefits of eucalyptus oil

मुंबई १० मे : आपल्याकडे अनेक प्रकारचे तेल उपलब्ध आहे जे त्वचा आणि केसांसह आरोग्यासाठीही तितकीच उपयोगी ठरते. असंच एक तेल म्हणजे निलगिरी तेल.निलगिरीचे तेल हे अत्यंत गुणकारी म्हणून ओळखण्यात येते. निलगिरी तेलाचा औषधीय उपयोग जास्त होतो. त्यामुळे बाम, इन्हेलर, रॅश क्रिम, मलम यामध्येही याचा उपयोग करण्यात येतो. विषाणूच्या संसर्गावरही निलगिरीचे तेल उपयुक्त आहे. त्यामुळे निलगिरी तेलाचे फायदे अधिक काय आहेत ते आपण जाणून घेऊया.

सूज आणि वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर:
सूज आणि वेदना कमी करण्यासाठी आपण निलगिरी तेल वापरू शकता. या तेलात अँटी इंफ्लिमेंट्री आणि इनॉलजेसिक मिश्रण असतात. हे कोणत्याही प्रकारची वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. या साठी वेदना असलेल्या भागात दिवसातून एक किंवा दोन वेळा मॉलिश करा. वेदना आणि सूज नाहीशी होईल.

माऊथवॉश करा
हे तेल दात आणि हिरड्यांच्या समस्येसाठी प्रभावी मानले आहे. या तेलात अँटी-ऑक्सिडंट तोंडातील असलेल्या संसर्गजन्य जंताना नष्ट करण्यासाठी फायदेशीर आहे. याचा वापर केल्याने जंत तोंडात उद्भवत नाही. या साठी आपण पेस्टमध्ये मिसळून देखील ब्रश करू शकता.

सर्दी -पडसं साठी फायदेशीर:
बदलत्या हंगामात सर्दी पडसं होणं सामान्य आहे. परंतु आपल्याला सर्दी पडसं जास्त प्रमाणात होत असेल तर हे तेल वापरावे. या मध्ये अँटीइंफ्लिमेंट्री,अँटिसेप्टिक गुणधर्म आढळतात. या साठी कोमट पाण्यात एक ते दोन थेंब तेलाचे घालून गुळणे केल्याने घशातील खवखव नाहीशी होते आणि या तेलाने मॉलिश केल्याने वेदना कमी होते. या तेलाची वाफ देखील घेतल्याने सर्दी पडसं मध्ये आराम होतो.

मुरुमांना दूर करतो:
निलगिरी तेल मुरुमांनाच नव्हे तर त्वचेच्या समस्या देखील दूर करतो. जळजळ कमी करणे, जखम बरी करणे, या साठी हे तेल उपयुक्त आहे. या व्यतिरिक्त त्वचेचे संसर्ग कमी करण्यासाठी देखील हे तेल फायदेशीर आहे.

News English Summary: We have a variety of oils available that are equally useful for health, including skin and hair. One such oil is eucalyptus oil. Eucalyptus oil is known to be very beneficial. Eucalyptus oil has high medicinal value. Therefore, it is also used in balms, inhalers, rash creams, ointments. Eucalyptus oil is also useful in viral infections. So let’s learn more about the benefits of eucalyptus oil.

News English Title: Eucalyptus oil is beneficiary to our health news update article

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या