Health First | भाजीत भाजी मेथीची | आरोग्यसाठी मोठ्या फायद्याची
मुंबई, १२ डिसेंबर: घरातील रोजच्या जेवणात आपण निरनिराळ्या भाज्यांचा समावेश करत असतो. त्यात पालेभाज्या म्हटलं की प्रथिने, जीवनसत्व आणि बरंच काही आरोग्यासाठी फलदायी ठरत. परंतु सर्व पालेभाज्यांमध्ये सर्वात वरचा क्रमांक येतो तो मेथीच्या भाजीचा हे वेगळं सांगायला नको. मेथीच्या भाजीचे फायदे समजून घेतल्यास मोठ्या प्रमाणावर आरोग्यदायी फायदे अनुभवता येऊ शकतात. त्यामुळे त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
मेथीचे दाणे किंवा मेथीची भाजी किती फायदेशीर (Fenugreek vegetable health benefits) आहे याचे महत्त्व आपण जाणतो. त्यामुळे मुलांना पराठ्यांच्या रूपात थोडी तरी मेथी खावी हा विचार आई करते. कारण जेवढे गोड महत्त्वाचे तेवढे कडूदेखील महत्त्वाचे. मेथीचे वरण, पीठ लावून पातळ भाजी, मुटके असे किती तरी प्रकार मेथीचे केले जातात. आमटीत मेथीचे थोडेसे दाणे घालणे किंवा मेथांबा ( गुळांबा) हे सर्व वेगवेगळ्या रूपात मेथी आहारात घेण्याचे प्रकार आपण अगदी सहजतेने करतो.
आयुर्वेदात मेथिका पीतबीजा (पिवळे बीज असतात) अशी नावे मेथीकरिता आली आहेत. मेथीचे दोन प्रकार असतात. लहान पाने असलेली भाजी म्हणून वापरल्या जाते. मोठी पाने असलेली मात्र पशू आहार म्हणून चारा स्वरूपात वापरल्या जाते. मेथी पचायला हलकी पण उष्ण असते. वात व कफ कमी करणारी आहे. मेथी पोटशूळ, पोटात वायू धरला असेल तर मेथीदाणे कुटून गरम पाण्यासह घेतल्यास वायू कमी करून पोटदुखी कमी करते.
त्यातील काही महत्वाचे फायदे अगदी मोजक्या शब्दात:
- मेथी भोजनात रुची आणणारी आहे. जिभेला चव नसेल किंवा जेवणाची इच्छा नसेल तर मेथी भाजी फायदेशीर ठरते.
- सूज किंवा गाठ, पू भरून फोड असेल, त्या जागी दुखत असेल तर मेथीदाणे वाटून त्याचा गरम लेप करावा. वेदना व सूज दोन्ही कमी होतात.
- प्रमेहात मेथीची भाजी मेथीदाण्याचा वापर आहारात करावा.
- मेथी वात कमी करणारी असल्याने वातामुळे होणारी अंगदुखी, अशक्तपणा यावर फायदेशीर ठरते.
- मेथी उत्तम स्तन्यजनन आहे. बाळंतिणीचे दूध वाढविण्याकरिता मेथीची भाजी, मेथीचे लाडू खाण्यास देतात.
- मेथी वात कमी करणारी तसेच उष्ण असल्याने प्रसूतीनंतर वात वाढू नये, शरीर स्थूल होऊ नये तसेच गर्भाशय शुद्ध होऊन साठलेले रक्त बाहेर काढते (आर्तव शुद्धी)
- त्यामुळे गर्भाशय पुन्हा सामान्य स्थितीत येण्यास मदत होते.
- मेथी मेद कमी करणारी असल्याने स्थौल्य कमी करणारी आहे. मेथीदाण्याचे चूर्ण याकरिता फायदेशीर आहे.
- मेथी वात कमी करणारी आहे म्हणून घेणे हितावहच आहे. परंतु उष्ण असल्याने रक्तपित्त व्याधी असल्यास वाढविणारी आहे. रक्तपित्त म्हणजे शरीरातून रक्तस्राव होत
- असेल म्हणजे घोळणा फुटणे, मूळव्याध, गुदमार्गातून, मूत्राद्वारे रक्त निघत असेल तर मेथीदाणे घेऊ नये.
बरेच जण मेथी आरोग्यासाठी चांगली म्हणून उगीच सकाळी मेथीदाणे खातात. पित्त प्रकृती, उष्णतेचा त्रास असणाऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
News English Summary: We know the importance of fenugreek seeds or fenugreek vegetable. Therefore, the mother thinks that her children should eat a little bit of fenugreek in the form of parathas. Because as important as sweet is, so is bitter. There are many types of fenugreek like fenugreek seeds, flour, thin vegetables, mutke. Adding a little fenugreek seeds to amti or taking methamba (rose) in all different forms of fenugreek diet is very easy. In Ayurveda, the names for fenugreek are methika pita bija (yellow seeds). There are two types of fenugreek. Used as a vegetable with small leaves. Large leaves, however, are used as fodder for animal feed. Fenugreek is easy to digest but hot. It reduces flatulence and phlegm. Fenugreek colic, if there is flatulence in the stomach, then crushing fenugreek seeds and taking it with hot water reduces flatulence.
News English Title: Fenugreek vegetable health benefits fitness article updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News