2 May 2025 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
x

Health First | हृदयविकाराचा झटका आणि अ‍ॅसिडीटीमधील नेमका फरक ओळखा

Heart attack, Acidity, Symptoms, healthline

नवी दिल्ली, १० डिसेंबर: आजकाल हृदयविकाराचा झटका येणे ही आपल्या आजूबाजूला अत्यंत सहज पाहायला मिळणारी आणि ऐकू येणारी गोष्ट झाली आहे. धकाधकीच्या आयुष्यात अनेकजण हृदयविकाराच्या झटक्याने जीव गमावत आहेत. यामध्ये अनेकदा निष्काळीपणा किंवा माहित असून देखील केलं गेलेलं दुर्लक्ष कारणीभूत असतं असं तज्ज्ञ डॉक्टर्स देखील सांगतात.

आपण अशी देखील उदाहरण पाहतो की एखादी व्यक्ती त्यादिवशी नित्यनियमाने कामे करते, व्यवस्थित जेवते, गप्पा मारते आणि अचानक अॅसिडिटी झाल्यासारखे वाटुन अस्वस्थ होते आणि चक्क हॉस्पिटलमध्ये जाण्याआधीच मृत्युमुखी पडते. ही अशी उदाहरणे ऐकली की आपला खुपच गोंधळ उडतो. मग अशा वेळी नेमके ही अॅसिडिटी आहे की हा हार्टअटॅक आहे हे नेमके कसे ओळखावे ?

आजकाल रुग्णांमध्ये अॅसिडिटी झाल्या सारखे वाटते, परंतु तो प्रत्यक्षात हार्टअटॅक असण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे सामान्य लोकांमध्ये ह्रदयविकाराबाबत असलेले अज्ञान आणि नियमित हेल्थ चेक-अप साठी त्यांनी केलेली टाळाटाळ. यावर उपाय हाच की,अॅसिडिटी व हार्टअटॅक मधला फरक जाणुन घेऊन हार्टअटॅकची लक्षणे आढळताच त्यावर ताबडतोब योग्य उपचार करणे. जाणून घ्या

अॅसिडिटी व हार्टअटॅक यांची लक्षणे वेगवेगळी आहेत मात्र आपण ती समजुन घेण्यात नेहमी गोंधळ करतो. म्हणुनच जाणुन घेऊयात या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे?

  • ब्लोटिंग हे अॅसिडिटीमध्ये एक प्रामुख्याने आढळणारे लक्षण आहे.मात्र जर तुम्हाला पहाटे/ दिवसाच्या सुरवातीला ब्लोटिंगचा त्रास होत असल्यास हे हार्टअटॅकचे लक्षण असु शकते.
  • सकाळी जर तुम्हाला पोटदुखी किंवा पोटात जळजळ होत असेल तर हे देखील हार्टअटॅक येण्याचे लक्षण असु शकते.
  • डाव्या हातात,त्याच्या वरच्या भागात येणारी तीव्र कळा किंवा शरीराला अचानक घाम सुटणे ही हार्ट अटॅक येतानाची लक्षणे आहेत.

जर तुम्हाला हार्टअटॅक येण्याची लक्षणे जाणवू लागली तर त्यावेळी तुम्ही नेमके काय करायला हवे?

हार्टअटॅक येताना घ्यावेत हे प्रथमोपचार-

  • त्वरित एन्टासाईड घ्या. जीभेखाली ५ मिग्रॅ ची सोरबीट्रेटची (Sorbitrate) गोळी ठेवा. सोबतच एस्पिरीन गोळी झटक्या दरम्यान चघळत रहा.
  • त्वरीत हॉस्पिटल मध्ये जा.डॉक्टर तुमचा ईसीजी व रक्तदाब तपासतील. काही रक्त तपासण्या तसेच कार्डिएक इनझायमी देखील केली जावू शकते.

दुसरा हार्टअटॅक टाळण्यासाठी काय कराल ?

  • औषधे वेळेवर घ्या.डॉक्टरांनी दिलेल्या सुचनांचे पालन करा.आहारात तेलकट पदार्थ खाणे टाळा.
  • क्वचित प्रसंगी चिकन किंवा मासे खा.पण रेड मीट खाणे कटाक्षाने टाळा.
  • नियमित व्यायाम करा.
  • जर आपण स्थुल असाल तर निरोगी आयुष्यासाठी वजन कमी करा.
  • धुम्रपान व मद्यापानाचे व्यसन टाळा.

 

News English Summary: Nowadays, having a heart attack has become a very easy thing to see and hear around us. Many are dying of a heart attack in a stressful life. Expert doctors also point out that this is often due to negligence or ignorance. Patients nowadays seem to have acidity, but it is also more likely to actually have a heart attack. The main reason for this is the ignorance of the general public about heart disease and their reluctance to undergo regular health check-ups. The solution is to know the difference between acidity and heart attack and treat it immediately as soon as the symptoms of heart attack appear. Find out

News English Title: Heart attack or acidity how to differentiate the both symptoms health news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या