12 August 2020 9:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

अक्षय कुमारच्या त्या कृत्याचं काय? ते कोणत्या मोहिमेत मोडतं?

मुंबई : सध्या तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर संपूर्ण चित्रपट श्रुष्टि ढवळून निघाली असताना, नाना पाटेकरांवर १० वर्षांपूर्वीच्या गैरवर्तणुकीच्या आरोपांवर बोट ठेवत अक्षय कुमारने हाऊसफुल ४ मधून तूर्तास लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर सुद्धा आरोप झाल्याने पेच अजूनच वाढला आहे. त्यातील नाना पाटेकर यांच्यावरील आरोप सध्या न्यायालयात गेल्याने थोडं सबुरीने घेणं गरजेचं आहे. परंतु काही महिन्यांपूर्वी अक्षय कुमारने केलेली कृत्य स्वीकारावी अशी होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

अक्षय कुमार जे करत आहे त्यावरून तो स्वतःला काही वेगळा आणि सर्वात सामाजिक भान असलेला अभिनेता म्हणून मिरवत आहे. परंतु, मागे एका जीन्सच्या शोमध्ये रॅम्पवॉक करताना मॉडेल सोबत चाळे आणि त्यानंतर जाहीर शो दरम्यान अक्षय कुमारने पत्नी ट्वीनकल खन्नाला स्वतःच्या जीन्सची झिप नको ते चाळे करत उघडण्यास सांगितली होती आणि त्याचा तो हावभाव सुद्धा विकृत वाटत होता. दरम्यान ते करण्यासाठीच त्याला मोठं मानधन देण्यात आलं होत असं समजतं. बरेच जण त्याच्या त्या जाहीर कृत्यावर नाराज झाले होत. त्यावर बोलताना नंतर त्या कृत्याला ‘लॉयल्टी’ असं नामकरण करत हसला होता. पण आपली ती ‘लॉयल्टी’ आणि दुसऱ्याची ती केवळ ‘गिल्टी’ असं सध्या त्याच सुरु आहे.

त्यानंतर एका खासगी वाहिनीवरील कॉमेडी शो दरम्यान त्याने प्रसिद्ध पत्रकार विनोद दुआ यांची कन्या मलायका दुआ हिच्याशी कार्यक्रमादरम्यान घंटी वाजवताना मागे उभं राहून “मल्लिका आप घण्टा बजाओ मैं आपको बजाता हूँ!”……असं धक्कादायक विधान केलं होत. त्यानंतर सुद्धा त्याच्यावर बरीच टीका झाली होती. त्यानंतर त्याने स्वतः यावर भाष्य न करता पत्नीला पुढे करून सारवासारव करण्यास सांगितल्याचे सर्वांना ज्ञात आहे. आता हे असले प्रकार #MeToo मध्ये येणे सुद्धा गरजेचे आहेत असं चित्रपट श्रुष्टीतील अनेकांना वाटत आहे.

काय होते त्याचे ते जाहीर कार्यक्रमातले चाळे आणि मलायका दुआला उद्देशून अश्लील वक्तव्य?

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Akshay Kumar(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x