23 September 2021 5:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

भाजपची सोशल मीडिया नीती पार्ट २; 'संपर्क फॉर समर्थन' मागील खरी योजना काय? सविस्तर

नवी दिल्ली : मागील निवडणुकीत म्हणजे २०१४ मध्ये देशातील सर्व विरोधी पक्ष समाज माध्यमांचा निवडणुकीसाठी उपयोग किती मोठ्या स्वरूपात करता येऊ शकतो याबाबतीत पूर्णपणे गाफील होते. सर्वांना गाफील ठेवत भाजपने अक्षरशः समाज माध्यमं २०१४ मध्ये अशा प्रकारे वापरली की, अनेक सुशिक्षित तरुण आणि तरुणी सुद्धा त्यांच्या रणनीतीपुढे भुरळ पडून अडकली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

परंतु कालांतराने सर्वच लहान मोठ्या राजकीय पक्षांना समाज माध्यमांचं महत्व पटलं आणि त्यांनी सुद्धा स्वतःच्या पक्षासाठी आणि भाजपाला तोंडघशी पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर समाज माध्यमांचा उपयोग सुरु केला आहे. त्यानंतर विरोधकांनी सुद्धा भाजप विरोधात समाज माध्यमांवर आघाडी उघडल्याने भाजप विरोधात नकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची चुणूक भाजपला लागली आहे.

त्यानुसारच भाजपने २०१४ च्या समाज माध्यमांच्या रणणितीतील एक ध्येय मात्र २०१९ च्या रणनीतीसाठी आजही कायम ठेवले आहे आणि ते म्हणजे पक्ष जास्तीत जास्त लोकांपर्यंत होकारात्मक दृष्टिकोनातून पोहोचविणे. परंतु ते साध्य करण्यासाठी मार्ग बदलला आहे. तो बदललेला मार्ग म्हणजे ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियान. अमित शहांचा हे ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियान नीट निरखून पाहिल्यास एक गोष्ट ध्यानात येईल की भाजपने प्रत्येक राज्यातील आणि स्थानिक भाषेतील परंतु राष्ट्रीय ओळख असलेल्या अराजकीय प्रतिष्ठित व्यक्तींची निवड केली आहे. परंतु ते करताना सुद्धा समाज माध्यमांवर ऍक्टिव्ह असणारी आणि ज्यांचे लाखो-करोडो चाहते म्हणजे फॉलोअर्स समाज माध्यमांवर आहेत असेच चेहरे निवडले गेले आहेत.

समाज माध्यमांवर त्याचा फायदा असा होतो की जेव्हा भाजपचे अध्यक्ष अमित शहा त्या ठरलेल्या प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाची ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियानाप्रमाणे भेट घेतात आणि त्या भेटीनंतर संबंधित प्रतिष्ठित व्यक्ती त्या भेटीविषयी एखाद ट्विट किंवा फेसबुक पोस्ट करतात, तेव्हा त्या भेटीबद्दलची माहिती लगेचच त्यांच्या देशभरातील लाखो-करोडो चाहत्यांपर्यंत पोहोचते हे त्यामागील मार्केटिंगचा गणित असाव. अर्थात या रणनीतीची त्या प्रतिष्ठित व्यक्तींना कल्पना नसावी.

ती व्यक्तिमत्व प्रतिष्ठित आणि अराजकीय असल्याने नकारात्मक चर्चेचे मुद्दे कमी होतात आणि विषय भाजपसाठी होकारात्मक होऊन जातो. भाजपचा संपर्क फॉर समर्थनचा उद्देश जर प्रामाणिक असला असता तर अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन इतरही प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांच्या भेटी गाठी घेतल्या असत्या जे समाज माध्यमांपासून कोसोदूर असतात उदाहरणार्थ आमटे कुटुंबीय, पंडित भीमसेन जोशी कुटुंबीय तसेच सुलोचना दीदी. पण असोत, एकूणच समजा माध्यम वेगळ्या मार्गाने हाताळणे आणि पक्ष जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचविण्याची ही कला मात्र विचार करायला लावणारी आहेत. एकूणच काय तर विरोधकांना अजूनही समाज माध्यम समजायला आणि त्याचा वेगवेगळया मार्गाने शिष्ठबद्ध वापर करायचा हे भाजपकडूनच शिकावं लागेल, नाहीतर २०१९ मध्ये विरोधकांचं पुन्हा येरे माझ्या मागल्या, असं झाल्यास नवल वाटायला नको.

हॅशटॅग्स

#Amit Shah(260)BJP(446)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x