15 December 2024 1:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Home Remedies on Headache | डोके जड होण्याची कारणे आणि घरगुती उपाय

Home remedies on headache

मुंबई, २४ जुलै | डोकेदुखी ही एक अनेकांच्या बाबतीत आढळणारी समस्या आहे. अनेकदा सततच्या ताणामुळे, थकवा आल्यामुळे अथवा तब्येत बरी नसल्यामुळे, पोटाशी संबंधित विकारामुळे, खूप वेळ डोळ्यांवर ताण आल्यामुळे अथवा मोठे आवाज सतत कानावर पडल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होतो. सोपे घरगुती उपाय केल्यावर अनेकदा डोकेदुखी (Home Remedies on Headache) बरी होते.

Home Remedies on Headache. Headaches are often caused by constant stress, fatigue or poor health, stomach disorders, prolonged eye strain, or loud noises :

डोळे तपासा, चष्मा लागला असेल अथवा चष्म्याचा नंबर बदलला असेल तर डोकेदुखी होऊ शकते. तसेच दातदुखी, कानदुखी अशा समस्या सतावत असताना त्यांच्या जोडीने काही वेळा डोकेदुखी होते. पण मूळ समस्या बरी होताच डोकेदुखी बरी होते हे लक्षात ठेवा. पण तसे झाले नाही अथवा वारंवार डोकेदुखीचा त्रास होऊ लागला तर वैद्यकीय सल्ला घ्या.

डोके जड होणे यावर हे करा घरगुती उपाय : 
* आल्याचा तुकडा चावून खावा.
* काही लवंगा घेऊन त्या तव्यावर भाजून गरम कराव्यात. त्यानंतर एका रुमालात त्या गरम लवंगा घालून त्यांचा वास हुंगल्यास डोके जड झाल्याने होणारी डोकेदुखी कमी होते.
* वेखंड, सुंठ किंवा दालचिनीची पेस्ट करून ती कपाळावर लावावी.
* आयुर्वेदिक अणू तेलाचे दोन थेंब नाकपुडीत घालावे. डोके जड पडणे यावर हे गुणकारी औषध आहे.
* आपल्या हाताचा अंगठा आणि तर्जनीमध्ये असणाऱ्या जागेत हलकासा दाब देऊन मसाज करावा. ह्या अॅक्युप्रेशर उपायामुळेही डोके जड झाल्यास आराम मिळतो.

डोके जड होऊ नये यासाठी अशी घ्यावी काळजी:
* संतुलित आहार घ्यावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश करा. ज्यादा वेळ उपाशी राहू नका.
* ‎दिवसभरात भरपूर पाणी म्हणजे किमान 7 से 8 ग्लासतरी पाणी प्यावे.
* दररोज सकाळी उठल्यावर ग्लासभर गरम पाणी प्यावे.
* ‎मसालेदार पदार्थ, तेलकट–तिखट-खारट पदार्थ, फास्टफूड ह्यासारखे पदार्थ वारंवार खाणे टाळावे.
* ‎चहा-कॉफी वारंवार पिणे टाळा.
* ‎स्मार्टफोन, काम्प्युटर, टीव्हीसमोर सतत बसू नका.
* ‎जागरण करणे टाळा. दररोज किमान 6 तासांची झोप आवश्यक असते. पुरेशी झोप घ्यावी.
* ‎नियमित व्यायाम करावा. मोकळ्या हवेत फिरायला जावे.
* ‎मानसिक ताणतणाव, चिंता यापासून दूर रहा. मन शांत ठेवण्यासाठी योगा, प्राणायाम, ध्यानधारणा करावी.
* ‎तंबाखू, गुटखा, सिगरेट, बीडीचे व्यसन करणे टाळा.
* ‎डोके जड होऊन डोके दुखत असल्यास वरचेवर वेदनाशामक औषधे घेणे टाळा.

News Title: Home remedies on headache in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x