20 May 2022 9:40 AM
अँप डाउनलोड

Black Spots On Face | चेहऱ्यावरील वांग | हे घरगुती उपाय करून चेहरा बनवा सुंदर

Home Remedies on Dark Spots

मुंबई, २२ सप्टेंबर | आपला चेहरा हीच आपली ओळख असते. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी अनेकजण वेगवेगळे पर्यायांचा वापर करत असतात. मात्र यामुळे अनेकांना चेहऱ्यावरील काळ्या डांगांचा सामना करावा लागतो. या काळा डांगांना वांग असे म्हणतात. तुम्हीही अशाच काळ्या डागांनी त्रासले असाल तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला या समस्येपासून मुक्तता मिळवण्याचे काही घरघुती उपाय सांगत आहोत.

Black Spots On Face, चेहऱ्यावरील वांग, हे घरगुती उपाय करून चेहरा बनवा सुंदर – Home Remedies to Help get rid of Dark Spots :

वांग म्हणजे काय ?
आपला चेहरा सुंदर दिसावा म्हणून अनेक जण वेगवेगले उपाय करतात. मात्र अनेकदा चेहऱ्यावर काळे डाग येतात ज्याला ग्रामीण भाषेत वांग असे म्हणतात. हे काळे डाग सूर्याची प्रखर अतिनील किरणे, विविध प्रकारची औषधे, ऍलर्जी अशा अनेक कारणांमुळे येऊ शकतात. चेहऱ्यावर आलेल्या वांगामुळे चेहरा निस्तेज होतो आणि यामुळे अनेक जण निराश होतात, सेल्फ कॉन्फिडन्स गमवून बसतात. परंतु या वांग पासून सुटका मिळवण्यासाठी आज आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग दूर होण्यास मदत होईल आणि तुमचा चेहरा पुन्हा उजाळेल.

Home-Remedies-on-Dark-Spots

हे घरघुती उपाय करा
कच्चा बटाटा:
वांगच्या समस्येवर कच्चा बटाटा देखील अतिशय प्रभावी ठरू शकतो. यासाठी कच्चा बटाटा अर्धा कापून घ्या आणि त्यावर पाण्याचे थेंब टाका आणि तो वांग असलेल्या त्वचेवर लावा. 10 मिनिटं सुकू द्या आणि कोमट पाण्याने धुवून टाका. हा उपाय महिन्यातून किमान 2 ते 3 वेळा करा.

मध आणि कोरफड:
मध आणि कोरफडचे मिश्रण देखील वांगच्या समस्येवर प्रभावी ठरते. यासाठी एका वाटीत मध आणि कोरफड घेऊन मिक्स करा. हे मिश्रण 10 मिनिटं तसंच ठेवा. त्यानंतर ते चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानतंर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करा.

How can we remove dark spots at home Naturally?

दही:
वांगच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी दही देखील उत्तम औषध आहे. यासाठी एका वाटीमध्ये दही घ्या आणि ते त्वचेवरील वांग असलेल्या जागी लावा. 20 मिनिटे चेहऱ्यावर तसेच राहू द्या. सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.

लिंबाचा रस:
चेहऱ्यावरील वांगच्या समस्येवर लिंबाचा रस अतिशय फायदेशीर आहे. यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि मध घ्या आणि ते मिक्स करा. हे मिश्रण वांग असलेल्या भागांवर लावा. किमान 15 मिनिटं तसंच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका. तुम्हाला फरक जाणवत नाही तोपर्यंत हे मिश्रण दररोज लावत रहा.

केळी:
चेहऱ्यावरील वांगच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी केळ कुस्करून घ्या. त्यात दूध आणि मध घाला. ते चांगले मिक्स करा. हे मिश्रण वांग असलेल्या भागावर लावा. किमान 30 मिनिटं तसंच राहू द्या. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Home remedy to get rid of black spots on face.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x