29 June 2022 6:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कायदेतज्ञांचा सल्ला आणि अनेकांच्या आमदारकी जाण्याची भीती | लवकर फ्लोअर टेस्टच्या मागणीसाठी फडणवीस राजभवनावर फडणवीसच ईडी कारवायांच्या याद्या दिल्लीत देतात | विरोधकांना त्रास देण्यासाठी तेच ईडी ऑपरेट करतात Global Surfaces IPO | ग्लोबल सरफेस कंपनी आयपीओ लाँच करणार | कंपनीचा तपशील जाणून घ्या HTC Desire 20 Pro | एचटीसी डिझायर 20 Pro स्मार्टफोन लाँच | 64 एमपी कॅमेरासह अनेक फीचर्स आदित्य ठाकरेंनी प्रचार-मेळाव्यातून टीकेचा सपाटा लावताच शिंदेंचा जळफळाट? | पहिल्यांदाच दिलं प्रतिउत्तर Horoscope Today | 29 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल शिंदेंचं भाजपसोबत उपमुख्यमंत्री पदासाठी फिक्सिंग झालंय? | मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहानानंतर नकारात्मक प्रतिउत्तर
x

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचं समर्थन करणारे लोकच शाहीन बागेतील आंदोलक: योगी आदित्यनाथ

CM Arvind Kejriwal, CM Yogi Adityanath, Shahin Baug

नवी दिल्ली: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज दिल्लीच्या बदरपुरात भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक सभेत जाहीर भाषण केले. यावेळी सभेला संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की ते येथे सायंकाळी ५ वाजता येणार होते, पण शाहीन बागच्या निदर्शनामुळे त्यांना थोडा उशीर झाला. ते पुढे म्हणाले की, शाहीन बागेत निषेधाच्या नावाखाली दिल्लीत केवळ अनागोंदी पसरवली जात आहे.

यावेळी योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनाही लक्ष्य केले. ते पुढे म्हणाले की केजरीवाल आणि पाकिस्तानला कलम ३७० हटवल्यावर खूप त्रास झाला. तसेच केजरीवाल शाहीन बागेत असामाजिक घटकांना प्रोत्साहन देत आहेत. अरविंद केजरीवाल हे शाहीन बागेत बिर्याणी खाण्यात व्यस्त असल्याने इतर गोष्टींसाठी त्यांना फुरसत नाही अशी विखारी टीका देखील त्यांनी केली.

दरम्यान, आम आदमी पार्टीच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेत संजय सिंह म्हणाले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मनोरुग्ण आहेत. केजरीवालसंदर्भात ते काहीही बडबडत आहेत. केजरीवालांचा पाकिस्तानशी संबंध आहेत, असं ते म्हणतात. मला नाही माहिती भारतीय जनता पक्षातील नेत्यांना पाकिस्तानसंदर्भातच सर्व माहिती कशी मिळते. आम्ही निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला आहे. निवडणूक आयोगाला भेटून आम्ही योगी आदित्यनाथ यांच्यावर निवडणूक प्रचारांतर्गत प्रतिबंध घालण्यासह एफआयआर दाखल करण्याची मागणी करणार आहोत.

 

Web Title:  AAP Party Leader Sanjay Singh reply CM Yogi Adityanath over Arvind Kejriwals relations Pakistan.

हॅशटॅग्स

#Yogi Sarkar(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x