3 May 2025 12:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Health First | आहारात पुदिना वापरल्याने होतात आरोग्यदायी फायदे

benefits of mint leaves

मुंबई २८ एप्रिल : पुदीना म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते ती हिरवीगार चटणी. पुदीनाच्या चटणीशिवाय पाणीपुरीला मजाच येत नाही. . ही एक औषधीय वनस्पती असून हिचे अनेक फायदे आहेत. पुदीन्याचा वापर हा फक्त स्वयंपाकातच नाहीतर पचन सुधारण्यासाठी, वजन घटवण्यासाठी, मळमळणं, डिप्रेशन, थकवा आणि डोकेदुखीवर आराम मिळवण्यासाठीही होतो. पुदीन्याच्या पानाचे याशिवायही अनेक फायदे आणि आरोग्यदायी लाभ आहेत. जसं अस्थमा, स्मरणशक्ती कमी झाल्यास आणि त्वचेच्या देखभालीतही याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत याच पुदीन्याचे फायदे

  1. पुदिन्यामध्ये असलेले फायबर आपले कोलेस्ट्रॉल (चरबी ) चे प्रमाण कमी करण्यास मदत करतात, तसेच याच्यात उपलब्ध असलेले मॅग्नेशियम आपली हाडे मजबूत करतात.
  2. जर कोणाला उलटी होत असेल तर २ चमचे पुदिना दर २ तासात त्या व्यक्तीला द्या यामुळे त्याची उलटी थांबेल व त्याला बरे वाटेल.
  3. जर आपल्याला पोटा संबंधी आजार असतील तर पुदिन्याच्या ताज्या पानामध्ये लिंबाचे रस व त्याच्या समान मात्रेत मध मिळून सेवन केल्याने जवळ जवळ पोटाच्या सर्वच आजारांवर लवकर आराम मिळतो.
  4. सर्दी झाल्यावर थोडा पुदिन्याचा रस घ्या आणि त्यात काळी मिरी आणि थोडा काळा मीठ मिळवा आणि ज्या प्रकारे आपण चहा बनवतो त्याच प्रकारे चहा सारखे उकळूवून घ्या व ते प्या, हा काढा सर्दी, खोकला, तसेच तापावर गुणकारी आहे.
  5. जर कोणाला खूप वेळ उचकी येत असेल तर त्याला पुदिन्याची काही पाने खायला सांगा त्यामुळे त्याची उचकी बंद होईल.
  6. मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर आपण पुदिन्याची सुखी पाने घ्या व त्याचा चूर्ण बनवा आणि दिसातून दोन वेळा मधात मिसळवून तो नियमित पणे काही दिवस घ्या असे केल्याने मासिक पाळी वेळेवर न येण्याची समस्या दूर होईल.
  7. जर कोणाला जखम झाली असेल तसेच खरचटले असेल तर त्याच्यावर पुदिन्याची ताजी पाने वाटून घेऊन लावा यामुळे जखम लवकर माठेल.
  8. जर आपल्याला गजकर्ण, खाज तसेच अन्य प्रकारचे त्वचेचे रोग असतील तर ताजा पुदिन्याची पाने घेऊन ती चांगली वाटून घ्या आणि हा लेप ज्या ठिकाणी खाज किंवा गजकर्ण झाल असेल तिथे लावा आपल्याला लगेच आराम मिळेल.
  9. जर आपल्या तोंडाला वास येत असेल तर पुदिन्याची पाने घ्या त्यांना सुकवून घ्या आणि त्याचा चूर्ण बनवा आणि याचा तुम्ही मशेरी सारखा वापर करा. असे केल्याने तुमच्या हिरड्या मजबूत होतील आणि तोंडाची दुर्गंध बंद होईल, असे तुम्ही एक महिन्याहून अधिक काळासाठी करा आपल्याला याचा फायदा नक्की होईल.
  10. पुदिन्याच्या रस मिठाच्या पाण्यात मिसळवून गुरळ्या करा, असे केल्याने आपला आवाज बसला असेल तर तो ठीक होईल.

उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचे फायदे:
कधी कधी गरमीच्या दिवसात अस्वस्थ तसेच घाबरल्या सारखे होते. त्यासाठी काही पुदिन्याची पाने तसेच अर्धा चमचा वेलचीचे चूर्ण एक ग्लास पाण्यात घेऊन ते उकळवा आणि ते पाणी गार झाल्यावर प्या, असे केल्याने आपल्याला बरे वाटेल. कॉलरा झाला असेल तर कांद्याचा रस व लिंबाचे रस पुदिन्याच्या रसा सोबत मिसळवून प्यायल्याने आराम मिळतो.

News English Summary: Mint is used not only in cooking but also to improve digestion, reduce weight, relieve nausea, depression, fatigue and headaches. Mint leaves also have many health benefits. It also plays an important role in asthma, memory loss and skin care.

News English Title: Mint leaves are beneficiary to our health news update article

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या