13 May 2021 8:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

विवाहबाह्य संबंध आता गुन्हा नाही, कलम ४९७ रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा क्रांतिकारी निकाल

नवी दिल्ली : देशातील स्त्री-पुरुष यांच्या विवाहबाह्य संबंधातील कायद्यासंदर्भात भारतीय दंड विधान म्हणजे आयपीसी कलम ४९७ वर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं आज महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. पती हा पत्नीचा मालक नाही, महिलेचा सन्मान करणं महत्त्वाचं असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं मांडलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भारतीय दंड विधान अर्थात आयपीसी कलम ४९७ हे महिलांच्या सन्मानाविरोधात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी हे कलमच रद्द अरुण ऐतिहासिक निकाल दिला आहे. भारतीय संस्कृतीत आणि समाजात महिलांचं स्थान सर्वात अग्रणी आहे. महिला तसेच पुरुषांना समाजात समान अधिकार आहेत. त्यामुळे व्यभिचार हे घटस्फोटाचं कारण ठरू शकते, परंतु तो गुन्हा ठरू शकत नाही, असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं निकालात स्पष्ट केलं आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x