2 May 2025 1:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा
x

Health First | अंगावरील अनावश्यक केसांपासून मुक्ती | नैसर्गिक उपचार पद्धती - नक्की वाचा

Natural remedies on unwanted hair

मुंबई, १८ सप्टेंबर | मुली तारुण्यावस्थेत येताना होणाऱ्या हॉर्मोनल बदलांमुळे त्यांच्या शरीरावर अनावश्यक केसांची वाढ होते. सर्वसाधारणपणे 18-45 या वयोगटात ही समस्या अधिक असते. हाता-पायांवर, चेहऱ्यावर, मानेवर तसेच छातीवर वाढणाऱ्या केसांना काढण्यासाठी ‘ वॅक्सिंग ‘सारख्या अत्यंत त्रासदायक पद्धतीचा वापर केला जातो. मात्र अंगावरील अनावश्यक केसांपासून मुक्ती मिळवण्यासाठी घरच्या घरीच काही सोपे उपाय शक्य आहेत.

अंगावरील अनावश्यक केसांपासून मुक्ती, नैसर्गिक उपचार पद्धती – Natural remedies on unwanted hair in Marathi :

कशामुळे वाढतात शरीरावर हे अनावश्यक केस ?
* स्त्रियांमध्येहोणाऱ्याहॉर्मोनलबदलांमुळेत्यांच्या रक्तातीलपुरुषी हॉर्मोन्सचे (androgens ) प्रमाण वाढते.
* तुमची जनुके शरीरावर अनावश्यक केस वाढीचे एक महत्त्वाचे कारणं असू शकते.
* तारुण्यामध्ये मासिक पाळी व इतर शारीरिक बदलांमुळे काही हार्मोन्स तयार होतात. त्यांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त असेल तर केसांची वाढ जास्त होते. तसेच काही स्त्रियांच्या स्त्रीबीजामध्ये (ovaries) एका पेक्षा जास्त गाठी (polycystic) असतील तर त्यांच्या चेह-यावर केसांची वाढ जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येते.
* विविध सौदर्य प्रसाधनांमधून अथवा संततीप्राप्ती करिता घेतल्या जाणाऱ्या काही औषधांतील ‘स्टिरॉइड’चा शरीरावर घातक परिणाम होतो व परिणामी शरीरावर अनावश्यक केस वाढतात.

कोणते घरगुती उपाय कराल?

1) पुदिन्याचा चहा:
फिजियोथेरपीसंशोधनाच्यानिष्कर्षानुसार[1] पुदिन्याचाचहा ( Spearmint tea ) स्त्रियांच्या रक्तात असणाऱ्या अधिकच्या पुरुषी हार्मोन्सचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.

कसा कराल हा चहा ?
* एक चमचा पुदिन्याची पान कपात घ्या
* त्यात उकळते गरम पाणी घाला व दहा मिनिटे राहू द्या
* आता हा चहा प्या .
* पाच दिवस असा चहा नियमित दिवसांतून दोनदा प्या.

Home remedies to get rid of facial hair :

2) हळद आणि बेसनाचा पॅक:
नॅशनल स्किन सेंटरचे संचालक नवीन तनेजा यांच्यामते , थोड्याशा दह्यासोबत हळद आणि बेसन कालवून तयार केलेला पॅक शरीरावरील अनावश्यक केस काढून टाकण्यास मदत करतात .

कसा तयार कराल हा पॅक ?
* एक टीस्पून बेसनात चिमुटभर हळद टाका .
* आता त्यात एक टी स्पून दही टाकून मिश्रण एकत्र करा.
* हा पॅक चेहऱ्यावर व मानेला लावून मसाज करा
* हा पॅक सुकल्यानंतर थोड्या वेळाने धुऊन टाका .

3) पॉमिस दगड:
तात्पुरते अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी तुम्ही पॉमिस दगडाचा वापर करू शकता. शरीरावर हा दगड घासल्याने केस मूळापासून निघण्यास मदत होते. यामुळे सारेच केस निघत नसले तरीही त्यांची वाढ कमी होण्यास मदत होते.

कसा वापराल पॉमिस दगड ?
* तुम्हाला ज्या भागावरील केस काढायचे आहेत तो भाग गरम पाण्याने भिजवा .
* नंतर गोलाकृती दिशेने दगड घासा. हळूहळू केस निघतील.
* वाहत्या पाण्याने तो भाग स्वच्छ करा व नंतर मॉइश्चरायजर क्रीम लावा .
* हा प्रयोग रोज आंघोळीच्या वेळेस करा .

Simple Home Remedies for Facial Hair Removal :

4) साखर आणि लिंबाचा पॅक:
सौंदर्यतज्ञ शहनाझ हुसेन यांच्यामते , चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी साखर आणि लिंबाचा पॅक वापरावा . लिंबातील सौम्य ब्लिचिंग क्षमते मुळे केसांची वाढ रोखण्यास मदत होते.

कसा बनवाल हा साखर आणि लिंबाचा पॅक ?
* ३० ग्राम साखर ,१० मिली ताजा लिंबाचा रस व १५० मिली पाणी एकत्र करा .
* मिश्रण व्यवस्थित एकत्र करून ते केस वाढण्याच्या दिशेने लावा .
* १५ मिनिटे हा पॅक राहू द्या . त्यानंतर थंड पाण्याने धूत हलकासा मसाज करा.
* साखर आणि लिंबाचा हा पॅक आठवड्यातून एकदा लावा .

5) मध आणि लिंबाचा पॅक:
शहनाझ हुसेन यांच्यामते , चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी लिंबू आणि मधाचा पॅकदेखील अतिशय उपयुक्त आहे. तुम्ही साखरेऐवजी मधाचा वापर करू शकता . मधाच्या वापराने चेहऱ्याला उजाळा येतो.

कसा बनवाल हा मध आणि लिंबाचा पॅक ?
* १० मिली ताजा लिंबाचा रस व ४० मिली मध एकत्र करा .
* मिश्रण व्यवस्थित एकत्र करून ते कापसाच्या बोळ्याने केस वाढण्याच्या दिशेने लावा .
* १५ मिनिटांनंतर थंड पाण्याने धूऊन टाका .
* मध आणि लिंबाचा हा पॅक आठवड्यातून दोनदा लावा आणि अगदी नैसर्गिकरीत्या अनावश्यक केसांपासून मुक्ती मिळवा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Natural remedies on unwanted hair in Marathi.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या