1 May 2025 10:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Health First | उन्हाळ्यात कोल्डड्रिंक्सऐवजी ही पेय नक्की प्या

Options, Cold drinks, Summer season, health article

मुंबई, ०१ मार्च: कडक उन्हाळ्यात प्रचंड घाम येतो, तहान लागते अशावेळी अनेकजण कोल्डड्रिंक्सकडे वळतात. मात्र काही शीतपेय ही शरीरास हानिकारक असतात अशावेळी आपण आरोग्यास फायदेशीर असंच पेयपान केलं पाहिजे. यामुळे तहानही भागते पण त्याचबरोबर ही पेय शरीरास फायदेशीर देखील असतात. (Options to cold drinks in summer season health article)

ताक (Taak) :
उन्हाळ्यात ताक पिणे हे केव्हाही उत्तम. त्यामुळे कोल्डड्रिंक्सना ताक हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मात्र ताक हे नेहमीचं ताजे प्यावे. ज्यांना पित्तांचा वारंवार त्रास संभावतो अशा व्यक्तींनी धणे- जिरे पावडर टाकून ताक प्यावे यामुळे आराम पडतो. ताक हे भूक वाढवणारे आणि अन्न पचविणारे आहे. ज्यांना ताकामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास संभावतो अशांनी रात्रीच्या जेवणात ताक पिणे टाळावे.

सरबत (Juice) :
याव्यतिरिक्त कोकम सरबत, लिंबू सरबत, आवळा सरबत, वाळा सरबत उन्हाळ्यात पिण्यास हरकत नाही. कोकम, आवळा सरबत ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांच्यासाठी खूपच फायदेशीर आहे. त्याव्यतिरिक्त ही पेय बाजारात सहज उपलब्धही होतात.

पेज (PeJ Konkani Word) :
तांदळाची पेज हे देखील उन्हाळ्यासाठी उत्तम पेय ठरू शकते. विविध आजारांमध्ये तांदळाची पेज ही फायदेशीर आहे. पण त्याबरोबर मुगाचे पाणी, धने-जिऱ्याचे पाणी, कुळथाचे पाणी यांचाही समावेश तुम्ही उन्हाळ्यातील आहारांमध्ये करू शकता.

 

News English Summary: In the scorching summer, when there is a lot of sweat and thirst, many people turn to cold drinks. However, some soft drinks are harmful to the body, so we should drink drinks that are beneficial to health. It also quenches thirst but at the same time these drinks are also beneficial to the body.

News English Title: Options to cold drinks in summer season health article news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या