12 December 2024 1:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त
x

कोविड लससाठी ऑनलाईन नोंदणी कशी कराल? | सविस्तर माहिती

Corona vaccinations, Cowin portal, Registration

मुंबई, ०२ मार्च: प्रत्येकाला कोरोनावरची लस मिळावी यासाठी कटिबद्ध असलेल्या केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेतील नोंदणीसाठी को-विन हे ॲप विकसित केले आहे. प्ले स्टोअरवर असलेले हे ॲप केवळ ॲडमिनिस्ट्रेटर्ससाठीच उपलब्ध असून लसीकरणासाठी नोंदणी आणि आरक्षण केवळ पोर्टलद्वारेच करता येणार आहे, असे केंद्रीय आरोग्य खात्यातर्फे सोमवारी स्पष्ट करण्यात आले.

या टप्प्यात कोणाला लस मिळणार?
ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना या दुसऱ्या टप्प्यात लस मिळणार आहे. ज्या लोकांना हृदय, कॅन्सर, किडनी संबंधी आजार, डायबेटिस, हायपरटेन्शन असे गंभीर असे आजार आहेत आणि त्यांचे वय हे 45 वर्षावर आहे, त्यांनाही या टप्प्यात लस मिळणार आहे.

लसीकरणासाठी कुठे आणि कशी नोंद करायची?
कोरोना लसीकरणासाठी http://cowin.gov.in या पोर्टलवर नोंद करणं गरजेचं आहे.

कोरोना लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रिया कशी आहे?

  1. http://cowin.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.
  2. इथं तुमचा वैध मोबाईल क्रमांक टाईप करा. पुढं “Get OTP” या बटणावर क्लिक करा.
  3. एका एसएमएसच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी देण्यात येईल.
  4. ओटीपी तिथं दिलेल्या ठिकाणी क्लिक करुन “Verify” या बटणावर क्लिक करा.
  5. ओटीपीची पडताळणी झाल्यानंतर तुम्ही “registration of Vaccination” अर्थात लसीकरणासाठीच्या नोंदणीच्या पेजवर पोहोचाल. इथे आवश्यक ती माहिती द्या.
  6. सर्व माहिती दिल्यानंतर उजव्या बाजूच्या कोपऱ्यावर “Register” या बटणावर क्लिक करा. ज्यानंतर तुम्हाला नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा एक मेसेज येईल.
  7. Account details page वर असणाऱ्या कॅलेंडर या बटणावर क्लिक करुन किंवा “Schedule Appointment” वर क्लिक करुन लसीकरणासाठीची तारीख मिळवता येईल.
  8. इथं “Book Appointment for Vaccination page” असाही पर्याय दिसेल. ज्या ठिकाणी तुम्हाला हव्या त्या केंद्राची आणि वेळेची निवड करत लसीकरणासाठीचं हे पुढचं पाऊल टाकणं शक्य होईल.

 

News English Summary: The Co-Win app has been developed by the central government to ensure that everyone is vaccinated against coronavirus. The app, which is available on the Play Store, is only available to administrators and registration and reservation for vaccinations can only be done through the portal, the Union Health Department said on Monday.

News English Title: Reservation for vaccinations can only be done through the Cowin portal news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x