27 April 2024 1:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Health first | केसांची समस्या आहे ? वापरा कांद्याचे तेल आणि पहा परिणाम

benefits of onion oil

मुंबई ८ एप्रिल : हिवाळ्यात आपली त्वचा निर्जीव होते, आपले केसही कमकुवत होऊ लागतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण या हंगामात गरम पाण्याचा जास्त वापर करतो. हिवाळ्यात गरम पाण्याचा वापर केल्याने तुमचे केस कोरडे व निर्जीव होतात, ज्यामुळे तुमचे केस कमकुवत होऊ शकतात आणि तुटू लागतात. यामुळे टक्कल पडण्याची भीती देखील आहे. तसेच केस गळतीची समस्या सुरु होते

सुंदर आणि लांब केस तर सर्वांनाच हवे असतात. परंतु, बदलती जिवनशैली व आहाराच्या सवयींमुळे केस गळण्याचे प्रमाण वाढत आहे. केस गळती थांबवण्यासाठी आपण अनेक उत्पादनांचा वापर करत असतो. परंतु, त्याचाही काही फायदा होत नाही. कांद्याचे तेल हे केस गळती थांबवून केसांच्या वाढीला मदत करते.

कांद्याचे तेल नियमित लावल्याने केस दाट, मजबूत व सुदृढ राहतात. केसांचे मूळ मजबूत करण्यासोबतच कोंडा दूर करण्यास सहाय्यक ठरते. विशेष म्हणजे, तुम्ही हे स्वतः तयार करू शकता. चला तर मग, आपण हे बनवण्याची प्रकिया पाहूया.

कांदा तेल रेसिपी
कांद्याचे तेल तयार करण्यासाठी प्रथम कांद्याचा रस घ्या. कांद्याचा रस काढण्यासाठी आपण ग्राइंडर वापरू शकता. सर्व प्रथम, पॅनमध्ये नारळ तेल घाला आणि या तेलात कांद्याचा रस घाला. चांगले मिसळल्यानंतर थंड होऊ द्या. थंड झाल्यावर गाळणीने गाळून घ्या व वेगळ्या भांड्यात काढा. आपण हे तेल 6 महिन्यांसाठी वापरू शकता.

हे तेल कसे वापरावे?
कांद्याचे तेल लावण्यासाठी प्रथम आपल्या केसांचे दोन भाग करा. यानंतर तेल घ्या आणि हलके हातांनी केसांच्या मुळांवर लावा. थोड्या वेळाने, आपण केसांना शॅम्पू लावून धुवा, जेणेकरून आपल्या केसांपासून तेल निघू शकेल.

कांदा तेलाचे फायदे
कांद्याचे तेल आपल्या केसांना खोलवर पोषण देते आणि केसांना कोरडे होण्यापासून वाचवते. या तेलाने केसांची मुळे मजबूत होतात. तसेच, कोंड्याची समस्या देखील दूर होते. हे तेल केस गळण्यास प्रतिबंध करते. तसेच, केसांच्या इतरही समस्या नाहीशा होतात.

News English Summary: In winter, your skin becomes lifeless and your hair becomes weak. The main reason for this is that we use more hot water this season. Using hot water in winter makes your hair dry and lifeless, which can weaken and break your hair. It also causes fear of baldness. It also starts the problem of hair loss .

News English Title: Use onion oil and stay away hair damage news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x