29 April 2024 5:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

BJP MP Brij Bhushan | बृजभूषण यांच्या अटकेच्या मागणीसाठी आज हरियाणा बंद, शेतकऱ्यांचा दिल्लीचे दूध आणि पाणी रोखण्याचा इशारा

BJP MP Brij Bhushan

BJP MP Brij Bhushan | भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी खाप पंचायतीने आज हरियाणा बंदची हाक दिली आहे. या दरम्यान दिल्लीला होणारा दूध आणि पाण्याचा पुरवठा बंद करण्याचेही सांगण्यात आले आहे.

झज्जर जिल्ह्यातील बहादूरगडमधील मंडोठी टोल नाक्यावर झालेल्या जनता संसदे दरम्यान ही घोषणा करण्यात आली. दलाल खाफ 84 शी संबंधित भूप सिंह दलाल यांनी बृजभूषण सिंह यांना लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक करण्याची मागणी केली आहे. शेतकरी संघटनांनीही त्याला पाठिंबा दिला आहे.

रविवारी झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी हरयाणातून दिल्लीला होणारा दूध, भाजीपाला यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित करण्याचा इरादा जाहीर केला होता. त्यानंतर १८ जून रोजी भारत बंदची ही हाक देण्यात आली आहे.

गेल्या १५९ दिवसांपासून रेल्वे कॉरिडॉरसाठी भूसंपादन करताना देण्यात आलेल्या मोबदल्यात झालेल्या कथित अनियमिततांचा निषेध ही मांडोठी टोलनाक्यावर झालेल्या बैठकीत करण्यात आला. याशिवाय २५ कलमी अजेंड्यावर चर्चा करण्यात आली.

१५ जूनपर्यंत वाट पाहू.. अन्यथा!!
कुस्तीपटूंना खाप पंचायती, शेतकरी, नीरज चोप्रा, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यांचे सहकार्य लाभले आहे. तर बजरंग पुनिया म्हणाला, ‘खेळाडूंची पंचायत बोलावण्यात आली होती. आम्ही जे बोललो ते सरकारसमोर मांडले. १५ जूनपर्यंत सर्व चाचण्या केल्या जातील, असे आश्वासन सरकारने दिले आहे. आम्ही १५ जूनपर्यंत वाट पाहू, असेही पंचायतीने सांगितले. तसे न झाल्यास मोठे आंदोलन करू. पुनिया म्हणाले की, सरकारने कुस्तीपटूंना आश्वासन दिले आहे की ब्रिज भूषण यांच्या कुटुंबातील कोणालाही डब्ल्यूएफआयसाठी निवडले जाणार नाही.

News Title : BJP MP Brij Bhushan Arrest demand Haryana Bandh check details on 14 June 2023.

हॅशटॅग्स

#BJP MP Brij Bhushan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x