3 May 2025 3:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Health first | लहान मुलांच्या जेवणासाठी चांदीच्या भांड्यांचा वापर करा कारण ते त्यांच्या आरोग्यास लाभदायी

benefits of silver utensils

मुंबई २० एप्रिल: तुम्ही आजवर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने होणारे लाभ याविषयी भरपूर वेळा ऐकलं असेल पण चांदीच्या भांड्यात जेवल्याने होणारे लाभ तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या चांदीच्या भांड्यात जेवल्याने आरोग्यास होणारे अगणित लाभ! लहान बाळाला ही आपण चांदीच्या वाटी तून किंवा प्लेट मधून भरवतो. चांदीच्या भांड्यातून खाल्ल्यास आरोग्य उत्तम राहते.आणि त्या पदार्थाला चांदीचा गुणधर्म लागतो. चांदी मुळे तुमच्या मुलाचे मानसिक आणि शारीरिक विकास चांगला होतो.म्हणून आजपासून नव्हे तर आता पासूनच तुम्ही आपल्या बाळाला जेवण केव्हा त्याचे औषधी त्याला चालू केले तरी चालते.

लहान मुलांना चांदीच्या भांड्यात जेवू घालण्याचे फायदे…

इंफेक्शनपासून बचाव:
चांदीला शुद्धतेचं प्रतिक मानलं जातं. यात अँटी मायक्रोबिअल गुण असतात. चांदीच्या भांड्यात मुलांना खाऊ घातल्यानं रोगांपासून त्यांचं रक्षण होतं. शरीरात संक्रमण होत नाही.

शरीर थंड राहतं:
चांदी हा एक थंड धातू आहे. चांदीच्या भांड्यात मुलांना जेवू घातल्यानं मुलांच्या शरीरात थंडावा निर्माण होतो. त्यामुळे मुल शांत राहतं आणि त्याच्या शरीरात अस्वस्थता निर्माण होत नाही. उन्हाळ्यात मुलांना चांदीच्या ग्लासमध्ये दूध पाजावं किंवा मुलांना चांदीच्या ताटात जेवू घालणं फायदेशीर ठरतं.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, ज्यामुळे मुलं खूप लवकर आजारी पडतात. चांदीच्या भांड्यात खाऊ घातल्यानं या धातूचे काही अंश जेवणात मिसळतात, त्यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि मुलं स्वस्थ राहतात.

सर्दी-खोकला होत नाही:
लहान मुलांमध्ये असलेल्या पित्त दोषामुळे त्यांना सतत सर्दी-खोकला होत असतो. चांदीच्या ग्लासमध्ये मुलांना पाणी पाजल्यानं ही समस्या दूर होते.

स्मरणशक्ती वाढते :
चांदीच्या भांड्यात जेवू घातल्यानं मुलं आजारी पडत नाही आणि स्वस्थ राहतात. चांदीमध्ये काही असे तत्त्व असतात जे खाण्यात मिसळतात. त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. म्हणूनच मुलांना चांदीच्या भांड्यात जेवू घालणं फायदेशीर होत असतं.
जर आपल्याला सुद्धा आपल्या मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा असं वाटत असेल तर त्यांना चांदीच्या ताटात जेवू घाला. हा धातू मुलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो.

 

News English Summary: You may have heard many times about the benefits of drinking water from a copper pot, but do you know the benefits of drinking from a silver pot? Know the innumerable health benefits of eating in a silver pot! We fill a small baby with a silver bowl or plate. Eating from a silver pot is good for health. And that substance has the properties of silver.

News English Title: Use silver utensils for baby feeding news update article

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या