1 May 2025 3:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

Ajit Pawar Vs Shinde Camp | भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटात मुख्यमंत्रीपदाचे 3 दावेदार, प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं, लवकरच भूकंप

Ajit Pawar Vs Shinde Camp

Ajit Pawar Vs Shinde Camp | अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून नंतर आपल्या समर्थक आमदारांसह एनडीएत प्रवेश केल्यापासून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत फूट पडल्याच्या बातम्या येत आहेत. खातेवाटपाच्या वेळीही शिवसेनेच्या आमदारांनी आक्षेप घेतल्याचे सांगण्यात येत होते. बुधवारी अजित पवार यांनी वांद्रे येथील एमईटी कॉलेजमध्ये समर्थकांची बैठक बोलावून आपल्याला शरद पवारांपेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचे सिद्ध केले. त्यांच्या मेळाव्यात बैठकीला ३२ आमदार उपस्थित होते, तर शरद पवार यांना केवळ १८ आमदारांचा पाठिंबा मिळाला होता. मात्र, या बैठकीत अजित पवार यांनी असे दावे केले ज्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाचं टेन्शन वाढलं आहे.

मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न

‘मी राज्याचा मोठा नेता नाही का? मी पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो आहे. पण मुद्दा हा नाही. मला राज्याचा मुख्यमंत्री व्हायचे आहे आणि जनतेच्या हिताच्या योजना राबवायच्या आहेत. २००४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या चुकीमुळे मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे गेले. राष्ट्रवादीकडे ७१ तर काँग्रेसकडे ६९ जागा होत्या. त्यावेळी चूक झाली नसती तर २०२३ पर्यंत राष्ट्रवादीला मुख्यमंत्री मिळाला असता असं सांगताना मला पुढे मुख्यमंत्री व्हायचं आहे हे त्यांनी स्पष्ट केल्याने शिंदे गटासह भाजपच्या नेत्यांचं देखील टेन्शन वाढलं आहे.

अजित पवार याची भाजपशी जवळीक वाढवणारी वक्तव्य

अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादीने 2014, 2017 आणि 2019 मध्येही भाजपशी चर्चा केली होती. मग त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली असताना त्यांना दोष का दिला जात आहे? 2014 मध्ये सिल्व्हर ओक येथे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी बैठक झाली होती. तसेच आम्हाला शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. २०१७ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक बैठक बोलावण्यात आली होती, त्यात राष्ट्रवादीचे नेते सहभागी झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास तयार होता, पण तेव्हा राष्ट्रवादीला शिवसेनेसोबत जायचे नव्हते. तेव्हा शिवसेना जातीयवादी आहे, असे म्हटले जात होते, पण २०१९ मध्ये त्यांनी त्यांच्याशी हातमिळवणी केली याची जाणीवपूर्वक अतःवं करून देताना भाजपचा बचाव केला.

शिंदे गटातील आमदारांमध्ये हाणामाऱ्या झाल्यावर शिंदेंचा अजून एक दावा

मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांचा समावेश करण्यात आल्याने शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिंदे गटाचे आमदार भारत गोगावले आणि संजय शिरसाट यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात काहीही आलबेल नसल्याचं वृत्त आहे. त्यातच आता मंत्रीपदासाठी शिंदे गटाच्या आमदारांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. एका मराठी दैनिकाने याबाबतची माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रीपदाच्या मुद्द्यावरून शिंदे गटाच्या आमदारांमध्ये बाचाबाची आणि वादावादी झाली, त्यानंतर प्रकरण किरकोळ हाणामारीपर्यंत पोहचलं. ज्यांना वर्षभर मंत्रीपद मिळालं त्यांचा राजीनामा घेऊन इतरांना संधी द्या, अशी मागणी काही आमदारांनी केली. त्यानंतर शिंदेसेनेचे आमदारांमध्ये अचानक राडा झाला. आमदारांमध्ये वाद झाल्याची माहिती समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूर दौरा अचानक रद्द करत मुंबईत दाखल झाले.

बुधवारी रात्री उशीरापर्यंत मुख्यमंत्र्यांकडून भांडखोर आमदारांच्या वादात मध्यस्थी करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय येत्या ११ ऑगस्ट पर्यंत शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय येणार असल्यानेही शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.

शिंदे गटातील आमदारांमध्ये वादावादी झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहे. मंगळवारी मुंबईत परतलेल्या मुख्यमंत्र्यांनी बुधवारी कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. दिवसभर शिंदे गटाचे वरिष्ठ नेते आणि आमदारांच्या बैठका मुख्यमंत्र्यांनी घेतल्याची माहिती आहे. आता आणि निवडणुकीनंतरही मीच मुख्यमंत्री राहणार असल्याचे शिंदेंनी समर्थक आमदारांना सांगितल्याचे वृत्त आहे.

News Title :  Ajit Pawar Vs Shinde Camp check details on 06 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar Vs Shinde Camp(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या