15 December 2024 8:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

BIG BREAKING | मध्य प्रदेश तीर्थ दर्शन यात्रा, भाजपच्या मुख्यमंत्री मामांनी लोकांना मामा बनवलं, भाजप नेत्यांची विमानाने कौटुंबिक तीर्थ दर्शन यात्रा

BIG BREAKING

BIG BREAKING | मध्य प्रदेशात सरकार वृद्धांना विमानाने तीर्थ यात्रेला पाठवत आहे. 21 मे 2023 रोजी प्रवाशांचा पहिला ग्रुप राजधानी भोपाळहून प्रयागराजला गेला होता. यात ३२ जणांचा समावेश होता. या ३२ प्रवाशांची यादी तपासली असता धक्कादायक डेटा समोर आला आहे. त्यानुसार…

* प्रवाशांमध्ये भाजप नेत्यांच्या अनेक नातेवाईकांचा यामध्ये समावेश आहे.
* विशेष म्हणजे ३२ प्रवाशांपैकी ८ प्रवासी थेट भाजपशी संबंधित असून ते भाजपमध्ये महत्वाची पदेही भूषवित आहेत.
* भाजपच्या नेत्याच्या सांगण्यावरून आपले नाव यादीत समाविष्ट केल्याची कबुली बहुतांश प्रवाशांनी दिली आहे.
* विशेष म्हणजे ३२ पैकी दोन प्रवासी तर तामिळनाडू आणि महाराष्ट्रातले असल्याचे डेटा सांगतो. पण हे लोक म्हणाले की, आम्ही ना यात्रेला गेलो आहोत, ना मध्य प्रदेशात गेलो आहोत. तर ब्रिजमोहन पचौरी या प्रवाशाने स्वत:ला भाजपचे भोपाळ जिल्हाध्यक्ष सुमित पचौरी यांचे काका असल्याचे सांगितले.

याबाबत माध्यमांनी सुमित पचौरी यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, “माझा एकही नातेवाईक तीर्थ दर्शन योजनेतून गेलेला नाही. जर कोणी गेले असेल तर ते माझ्या माहितीत नाही. असे असतानाही बहुतांश प्रवासी भाजपशी संबंधित असल्याने निवडीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकूण तीर्थ यात्रेच्या नावाखाली मध्य प्रदेश भाजप सरकार आर्थिक घोटाळा करत असल्याची माहिती माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 23 फेब्रुवारी 2023 रोजी उज्जैनमधील महिदपूर येथे एका कार्यक्रमात विमानाने यात्रेची घोषणा केली होती. “ज्येष्ठांनो, तीर्थयात्रा पुन्हा सुरू झाली आहे. यावेळी तुम्हाला केवळ रेल्वेने नव्हे, तर विमानानेही घेऊन तीर्थ यात्रेला पाठवेन.

त्यानंतर राज्यात प्रथमच सरकारी खर्चाने विमानाने तीर्थयात्रा सुरू करण्यात आली. धार्मिक ट्रस्ट आणि धार्मिक कार्य विभागाने 12 एप्रिल 2023 रोजी यायात्रेशी संबंधित परिपत्रक जारी केले. त्यानुसार प्रवासी निवडीचे दोन निकष आहेत. सर्वप्रथम प्रवाशाचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असावे. दुसरं म्हणजे तो इन्कम टॅक्स भरणारा नसावा.

परिपत्रकानुसार प्रवाशांच्या निवडीची जबाबदारी भाजपने जिल्हाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. विहित संख्येपेक्षा अर्जांची संख्या अधिक असल्यास प्रवाशांची निवड संगणकीय लॉटरी पद्धतीने करावी, असेही सांगण्यात आले आहे. मात्र भाजप पदाधिकारीच यामध्ये घोटाळे करत असल्याचं समोर येतंय.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत यात्रांना २१ मेपासून सुरुवात झाली आहे. १९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात २५ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. वाचा भोपाळहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट…

26 प्रवाशांना फोन, फिजिकल व्हेरिफिकेशन

प्रवाशांच्या यादीतील सर्व ३२ जणांशी दैनिक जागरणच्या प्रतिनिधीनीं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी २६ जणांशी दैनिक जागरणचे प्रतिनिधी बोलले. दोघांकडे फोन नंबर नव्हते. चार नंबरवर वारंवार फोन करूनही फोन रिसीव्ह झाला नाही. यानंतर दैनिक जागरणच्या प्रतिनिधीनीं 5 जणांच्या घराची फिजिकल व्हेरिफिकेशनही केली. सरकारी खर्चाने यात्रेसाठी गेलेले हे भाविक मोठ्या इमारतींमध्ये राहत असल्याचे निदर्शनास आले. काहींची घरं आणि दुकाने भाड्याने आहेत, तर काहींच्या घरात रेशनचे दुकान सुरू आहेत. त्यामुळे हे प्रवासी सधन घरातील असल्याचं समोर आलं आहे. नियमानुसार भोपाळहून केवळ भोपाळ जिल्ह्यातील यात्रेकरूच यात्रेला जाऊ शकत होते. जिल्हा पंचायत कार्यालयाने जाहीर केलेल्या यादीमध्ये सर्व ३२ प्रवाशांची नावे, जन्मतारीख, पत्ता, मोबाइल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक लिहिलेला आहे.

News Title : BIG BREAKING MP Tirth Darshan Yatra report exposed BJP 15 August 2023.

हॅशटॅग्स

#BIG BREAKING(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x