4 May 2025 3:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

BJP Politics | मध्य प्रदेशात निवडणुक ३-४ महिन्यावर आली, आधी भाजप कार्यकत्याने आदिवासी तरुणावर लघवी केली, मग मुख्यमंत्र्यांनी पाय धुतले

BJP Politics

BJP Madhya Pradesh Politics | मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका फक्त ३-४ महिन्यांवर आल्या असताना भाजप कार्यकर्त्यांचा उन्माद उफाळून आल्याने भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता राजकीय नौटंक्या देखील तेजीत आल्या आहेत असंच म्हणावं लागेल.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे राज्यातील एका आदिवासीचा अपमान केल्याच्या मुद्द्यावरून बॅकफूटवर दिसले. पण गुरुवारी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सिधी मतदारसंघातील लघवी प्रकरणात बळी पडलेल्या आदिवासी व्यक्तीची भेट घेऊन त्यांचा सत्कार बरीच राजकीय ड्रामेबाजी केल्याचं पाहायला मिळतंय. भोपाळमधील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी या पीडित आदिवासी तरुणाला बोलाविण्यात आलं होतं.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, मुख्यमंत्री स्वत: आदिवासी व्यक्तीला घेऊन निवासस्थानाच्या आत आले होते. तेथे एक खुर्ची ठेवण्यात आली होती आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला या खुर्चीवर बसवले. खुद्द मुख्यमंत्री समोरच्या खुर्चीवर बसले नव्हते तर एका छोट्या टेबलावर बसले होते. यानंतर थाळी मागवण्यात आली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदिवासी पीडिताचे पाय हाताने धुतले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उभे राहून पीडितेच्या कपाळावर टिळक लावले आणि त्यानंतर माळ घालून त्यांचा सत्कार केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना शाल भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदिवासी तरुणाला दुसऱ्या खुर्चीवर बसून त्याला हाताने खाऊ घातले. यानंतर दोघांमध्ये काही वेळ संभाषण झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत होते.

या प्रकरणातील आरोपी परवेश शुक्ला याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती आणि तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलं होतं. प्रवेश शुक्ला चा एक व्हिडिओ समोर आला होता. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की, आरोपीने पीडितेवर लघवी केली आणि घटनेनंतर आरोपींवर कारवाई करण्यात आली. त्याला पकडण्यात आले आहे. त्याच्यावर बुलडोझरची कारवाई करण्यात आली आहे. हा एक पैलू आहे. मुख्यमंत्र्यांनी पीडितेची भेट घेतली असून ही त्याची दुसरी आणि मानवतावादी बाजू आहे.

News Title : BJP Politics on Urine on Adivasi check details on 06 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Madhya Pradesh Pravesh Mishra(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या