Rahul Gandhi Video | दिल्लीतील रामलीला मैदानावर रविवारी काँग्रेसचा हल्लाबोल बोल मेळावा पार पडला. महागाईच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला घेरण्यासाठी बोलावलेल्या या रॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते. राहुल गांधी यांनीही या रॅलीत भाषण केलं, ज्यात त्यांनी सर्वसामान्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतींचा मुद्दा उपस्थित केला. राहुल यांच्या भाषणाचा उद्देश केंद्र सरकारचे अपयश अधोरेखित करणे हा होता, पण काही काळानंतर त्यांचे हे भाषण आणखी काही कारणाने चर्चेत आले.

राहुल गांधी यांच्या भाषणाची 10 सेकंदाची क्लिप व्हायरल :
खरं तर राहुल गांधी यांच्या भाषणाचा 10 सेकंदाचा भाग सोशल मीडियावर व्हिडिओ क्लिपच्या रुपात व्हायरल होत गेला. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी महागाईवर भाषण करून पिठाची किंमत प्रति किलोऐवजी प्रति लिटरमध्ये सांगत आहेत. राहुल यांचा हा व्हिडिओ एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेले भाजपचे प्रवक्ते शहजाद जयहिंद यांच्यासह अनेकांनी शेअर केला होता. “राहुल गांधी : आटा आज 22 रुपये प्रति लीटर, 40 रुपये प्रति लीटर. महागाईच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांना गांभीर्याने घेणे म्हणजे काँग्रेसच्या भ्रष्टाचारविरोधी गोष्टी गांभीर्याने घेणे किंवा हिटलरला मानवी हक्कांच्या बाबतीत गांभीर्याने घेणे, असे काही तरी अभिप्रेत आहे. यूपीएच्या राजवटीत महागाई बराच काळ दोन अंकी होती असं म्हटलं आहे.

काय आहे या क्लिपचं सत्य?
राहुल गांधींचा हा 10 सेकंदाचा व्हिडिओ ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर जोरदार शेअर करण्यात आला आहे. पण हे पीठ लिटरमध्ये मोजलं पाहिजे, असं राहुल गांधी खरंच म्हणाले होते का? काय आहे या क्लिपचं वास्तव? हे जाणून घेण्यासाठी आम्ही काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर राहुल गांधी यांच्या भाषणाचा भाग ऐकला, ज्यात ते पिठाच्या किंमतींचा उल्लेख करत आहेत. हे ऐकल्यावर राहुल गांधी यांनी प्रत्यक्षात आपल्या भाषणात महागडे पेट्रोल, डिझेल आणि मोहरीच्या तेलाचे दर लिटरमध्ये सांगितले आणि मग त्याच प्रवाहात पीठाचे भावही चुकून लिटरमध्ये बोलले, हे दिसतंय. मात्र भाजपने हाच भाग व्हायरल क्लिप म्हणून शेअर केला जात आहे. पण या क्लिपमध्ये त्यानंतरचा भाग लगेचच काढून टाकण्यात आला आहे, जेव्हा राहुल गांधी पिठाची किंमत लिटरमध्ये सांगितल्यानंतर दुसऱ्याच क्षणी ते लक्षात येत आपली चूक सुधारताना दिसत आहेत, पण तो भाग कट करण्यात आला आहे.

वास्तविक लिटरचा किलो आणि किलोचा लिटर असा उच्चार केल्याने संबंधित कोणत्याही वस्तूंचे महागाईने वाढलेले भाव बदलणार नाहीत. मात्र प्रॉम्प्टर घेऊन भाषण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या भाषणातील अशा चुका शोधून काढल्यातर २-३ तासाची व्हिडिओ क्लिप बनायची हे देखील तितकंच खरं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Congress leader Rahul Gandhi speech viral video fact check 04 September 2022.

Rahul Gandhi Video | राहुल गांधींनी सभेत महागाईचा पाढा वाचला आणि भाजप IT सेलने ती क्लिप जाणीवपूर्वक अर्धवट पसरवली