7 August 2020 9:16 AM
अँप डाउनलोड

मला असे समजले आहे, की ३ सप्टेंबरला नवीन कोणीतरी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे: कुमारस्वामी

बंगळुरू : कर्नाटकात नव्या सरकारची स्थापना होऊन सुद्धा अनेक महिन्यांपासून जेडीएस-काँग्रेस आघाडीच्या कुरबुरी थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तसेच काँगेस नेते सिद्धरामय्या यांनी केलेल्या एका विधानामुळे पुन्हा त्याच कुरबुरींना तोंड फुटलं आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एक वक्तव्य केलं की, मला जर जनतेचा आशीर्वाद मिळाला तर मी पुन्हा एकदा कर्नाटकचा मुख्यमंत्री होईन.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सिद्धरामय्या यांच्या या विधानाला अनुसरून कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री कुमरस्वामी म्हणाले की, ‘माध्यमांतील माझ्या मित्रांकडून ३ सप्टेंबरला नवीन कोणीतरी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे असं मला समजलंय’. त्यांच्या या विधानाने जेडीएस आणि काँग्रेस आघाडीतील कुरबुरी अजूनसुद्धा सुरूच असल्याचं समोर येत आहे.

परंतु पुढे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी स्पष्ट केलं की, मला कोणतीही चिंता नाहीये. मी किती काळ मुख्यमंत्री म्हणून राहीन यापेक्षा, मी जे काम करत आहे, तेच माझे भविष्य ठरवेल, असे एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. कर्नाटकातील आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही यावेळी कुमारस्वामी यांनी कोणाचंही नाव न घेता केला. परंतु, हे सर्व असलं तरी आमचं सरकार पडणार नाही असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#karnatak Assembly Election 2018(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x