20 August 2022 10:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Money Alert | नोकरदारांनी या चुका केल्यास बंद होईल तुमचं ईपीएफ खातं, जाणून घ्या ईपीएफओचे महत्त्वाचे नियम Viral Video | होमवर्क पासून सुटकेचा जबरदस्त उपाय, चिमुकल्याने सुरु केली टिचरची स्तुती, मजेदार व्हिडिओ व्हायरल NEFT Transactions Fee | बँकेच्या ब्रान्चमधून एनईएफटीचा वापर महागणार? आरबीआयचा 25 रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव SEBI Shares Sell Rule | शेअर्सच्या विक्रीसाठी 14 नोव्हेंबरपासून ब्लॉक यंत्रणा लागू होणार, जाणून घ्या कसं काम करणार Career Horoscope | 20 ऑगस्ट, करिअरच्या दृष्टीने 12 राशींच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Ank Jyotish | 20 ऑगस्ट, शनिवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Horoscope Today | 20 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

नवाब मलिक मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी नव्हते | संजय दत्त होता | भाजपच्या स्क्रिप्टवर शिंदेंच्या जनतेला टोप्या

Eknath Shinde

Eknath Shinde | महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष टीपेला गेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात आता शिवसेनेचे ३९ आमदार आणि १२ अपक्ष असे एकूण ५१ आमदार आहेत. आजच उच्च तंत्रशिक्षण मंत्री हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. तसंच सोमवारी आणखी एक-दोन आमदार येतील असं दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. तसंच ही लढाई आता सुप्रीम कोर्टातही गेली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेत उभी फूट पडली आहे.

महाराष्ट्रातल्या सत्ताकारणाचा खेळ अखेर अपेक्षेप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात पोहचला. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेते पदाला शिंदे गटाचा आक्षेप असल्याची याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. अशात एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट समोर आलं आहे.मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर..

२५-३० वयोगातील तरुणांना हे माहिती नसल्याने :
मात्र आता एकनाथ शिंदे यांनी यांनी भाजप पुरस्कृत ट्विट करण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याला संदर्भ आहे मुंबई बॉम्ब स्फोटाचा. मात्र इतिहास पुराव्यानिशी तपासून पाहल्ल्यास नवाब मलिक यांचा यामध्ये कोणताच संबंध नव्हता. मात्र तत्कालीन खासदार संजय दत्त यांचा मुलगा संजय दत्त या प्रकरणात थेट आरोप होता आणि न्यायालयाने शिक्षा सुद्धा ठोठावली होती. विशेष म्हणजे त्यावेळी युतीच सरकार असल्याने संजय दत्त थेट आपल्या वडिलांसहित मदतीसाठी मातोश्रीवर पोहोचला होता. त्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत अनेक मंत्रिपदाची मलाई खाल्ली आहे. मात्र जुन्या पुढील हे माहिती असलं तरीही नव्या आणि २५-३० वयोगातील तरुणांना हे माहिती नसल्याने शिंदे केवळ भाजपच्या स्क्रिप्टवर विषय पुढे आणत आहेत हे देखील अधोरेखित होतं आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde allegations over Mumbai Blast is political agenda of BJP said experts check details 27 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x