2 May 2025 12:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Eknath Shinde | सत्तेसाठी जिवलगांचीही चिंता नाही? | पत्नीला इस्पितळात सोडून संजय राठोड गुवाहाटी गेले

Eknath Shinde

Eknath Shinde | शिवसेनेविरोधात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाने महाराष्ट्रात राजकीय अराजक निर्माण झालं आहे. शिंदे यांनी तब्बल ३५ पेक्षा अधिक शिवसेनेचे आमदार फोडल्यानं आता ठाकरे सरकार कोसळणार ही शक्यता दाट झाली आहे. एकनाथ शिंदे यांची आवश्यक असलेल्या आमदारांची बेरीज जवळपास जुळली असल्याचं दिसत असून आता मुख्यमंत्री काय करणार याकडेच महाराष्ट्राच लक्ष लागलं आहे.

४० पेक्षा अधिक आमदार माझ्यासोबत :
एकनाथ शिंदे यांनी ४० पेक्षा अधिक आमदार माझ्यासोबत असल्याचा दावा गेल्यानंतर राज्यात मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन भेटावं असं सांगत मातोश्री सोडली. मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर चित्र आणखीनच बदललं आहे.

संजय राठोड यांच्या पत्नी रुग्णालयात दाखल :
दरम्यान त्यांच्यासोबत असलेल्या संजय राठोड यांच्या घरात आजारपणामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. कारण संजय राठोड यांच्या पत्नींना रुग्णालयात दाखल करण्यात आहे. संजय राठोड यांनी पक्ष सोडू नये अशी शितल राठोड यांची इच्छा होती. परंतु त्यांचा विरोध पत्करून त्यांनी गुवाहाटी गाठलं आहे.

पत्नी शितल राठोड यांना बीपीचा त्रास :
पत्नी शितल राठोड यांना बीपीचा त्रास सुरु झाल्याने जेजे रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दरम्यान गेले काही दिवस संजय राठोड हे घरुन नॉट रिचेबल होते. त्यानंतर एकनाथ शिंदेचा प्रस्ताव घेवून संजय राठोड गेल्याने शितल राठोड यांना धक्का बसला काल दिवसभर संजय राठोड जेजे रुग्णालयात होते, पण आज ते गुवाहाटीसाठी निघाले असल्याचे सांगण्यात आले आहे. संजय राठोड यांनी पक्ष सोडू नये अशी शितल राठोड यांची इच्छा होती. परंतु संजय राठोड यांनी गुवाहाटी गाठल्याने पत्नी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde in Guwahati with Shivsena rebel MLAs check details 23 June 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(97)#SanjayRathod(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या