27 June 2022 1:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
रविवारी कोर्ट बंद असतं | संध्याकाळी 6.30 वाजता शिंदे गटाची केस सुप्रीम कोर्टात | 7.30 ठरलं उद्या सुनावणी | नेटिझन्सच्या दिलासा चर्चा Multibagger Stocks | छोटे शेअर्स वेगात | या 13 रुपयाच्या शेअरने 1 वर्षात तब्बल 1481 टक्के परतावा दिला Mutual Fund SIP | महीना 1000 रुपयांच्या एसआयपीने तुम्हाला 32 लाख रुपये मिळतील | अधिक जाणून घ्या Eknath Shinde | शिंदे गटाला 'दिलासा' मिळावा म्हणून थेट सुप्रीम कोर्टात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे? Horoscope Today | 27 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Diabetes Symptoms | मधुमेह कुठल्याही वयात होऊ शकतो | ही प्राथमिक लक्षणे तुम्हाला आहेत का खात्री करा Multibagger Stocks | हा 39 रुपयांचा शेअर तुमच्यकडे आहे? | फक्त 21 दिवसात 164 टक्के परतावा दिला
x

Social Talk | हिंदुह्रदयसम्राट, शिवसेनाप्रमुख, माननीय एकनाथसाहेब शिंदे! | मॅन्युफॅक्चर्ड बाय बीजेपी | एक्सपायरी डेट?

Eknath Shinde

Eknath Shinde | गुवाहाटीतील एक पंचतारांकित हॉटेलमध्ये, महाराष्ट्रातील शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबले आहेत. उद्धव ठाकरे सरकारविरुद्ध लढण्याचे कुभांड याच हॉटेलमधून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात रचले जात आहे. या पंचतारांकित हॉटेलमध्ये 70 खोल्या सात दिवसांसाठी बुक करण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना बंडखोर आमदार सोमवारी भाजपशासित गुजरातमधील हॉटेलमध्ये होते. त्यानंतर त्यांनी आपला मुक्काम आसामामधिल गुवाहटीला हालवला.

७ दिवसांचा संपूर्ण खर्च 1.14 कोटी रुपये :
गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये रुमसाठी सात दिवसांचा दर 56 लाख रुपये आहे. हॉटेलमधिल काही सूत्रांनी आणि स्थानिक राजकारण्यांच्या मते इथे फुड आणि इतर सेवांचा दररोजचा खर्च अंदाजे 8 लाख रुपये आहे म्हणजे सात दिवसांचा संपूर्ण खर्च 1.14 कोटी रुपये आहे.

१२ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी :
महाविकास आघाडीकडे तिन्ही पक्ष मिळून १६२ आमदार आहेत. अशात ३७ आमदारांनी बंड पुकारलं आहे. १६२ पैकी १२ आमदारांचं निलंबन झालं तर १५० ची संख्या राहते. म्हणजेच बहुमताची संख्या राहिल. यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे. एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संजय शिरसाठ, महेश शिंदे, अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, भारत गोगावले यांच्यासह बारा नावं या पत्रात आहेत. या सगळ्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्र लिहून केली आहे.

शिवसेनेच्या चिन्हासहित पक्ष ताब्यात घेण्याच्या तयारी :
एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षावर पक्ष चिन्हासहित दावा करण्याची तयारी केली आहे. तसेच आम्हीच खरी शिवसेना आणि मीच पक्षाध्यक्ष असेन असे संकेत दिले आहेत. त्यामुळे भविष्यातील या रणनीतीवरून समाज माध्यमांवर देखील खिल्ली उडवली जाऊ लागली आहे. एकनाथ शिंदेंच्या व्यक्तिमत्वात तू गुण अजिबात नाही आणि लोकं त्यांना स्पष्टपणे नाकारतील अशा टिपण्या समाज माध्यमांवर सुरु झाल्या आहेत. तसेच सामान्य लोंकांना शिंदेनी बाहेरील राज्यात लपून सुरु केलेली महाराष्ट्रासंबंधित सौदेबाजी अजिबात पटलेली नाही. त्यामुळे भविष्यात या गटातील आमदारांना मोठा फटका बसू शकतो तर अनेकांचं राजकीय आयुष्य संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे एकनाथ शिंदेंना जरी भाजपाने मोठं केलं असेल तरी ते जास्त काळ टिकणार नाही हे सत्य आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde looking for charge of whole Shivsena party check details 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x