27 June 2022 1:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
रविवारी कोर्ट बंद असतं | संध्याकाळी 6.30 वाजता शिंदे गटाची केस सुप्रीम कोर्टात | 7.30 ठरलं उद्या सुनावणी | नेटिझन्सच्या दिलासा चर्चा Multibagger Stocks | छोटे शेअर्स वेगात | या 13 रुपयाच्या शेअरने 1 वर्षात तब्बल 1481 टक्के परतावा दिला Mutual Fund SIP | महीना 1000 रुपयांच्या एसआयपीने तुम्हाला 32 लाख रुपये मिळतील | अधिक जाणून घ्या Eknath Shinde | शिंदे गटाला 'दिलासा' मिळावा म्हणून थेट सुप्रीम कोर्टात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे? Horoscope Today | 27 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Diabetes Symptoms | मधुमेह कुठल्याही वयात होऊ शकतो | ही प्राथमिक लक्षणे तुम्हाला आहेत का खात्री करा Multibagger Stocks | हा 39 रुपयांचा शेअर तुमच्यकडे आहे? | फक्त 21 दिवसात 164 टक्के परतावा दिला
x

अजून आमदार फुटावे म्हणून काही माध्यमांनी बंड करणाऱ्या गटाला किती मंत्रिपदं मिळणार याच्या पुड्या सोडल्या? | नेटिझन्सचा संशय

Eknath Shinde

Social Talk | महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी १४४ हा स्पष्ट बहुमताचा आकडा आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे समर्थक ५० आमदार आणि भाजपचे समर्थक ११४ आमदार असे मिळुन १६४ आमदारांचे बहुमत विधान सभेत सिद्ध करून राज्यात भाजप+शिवसेना ( शिंदे गट ) असे सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत.

शिंदे यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे 37 पेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय आणखीही काही आमदार शिंदेंच्या गटात सामील होणार असल्याचं समोर येत आहेत. अशात आता नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेच्या शिंदे गटाची आमदार संख्या पन्नासवर पोहोचणार आहे.

बंडानंतर शिवसैनिक आक्रमक :
दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राशी फेसबुकद्वारे संवाद साधत बंडखोर आमदारांनी समोर येऊन सांगावं मी राजीनामा देतो हवंतर पक्षप्रमुख पदही सोडतो असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे गुलाबराव पाटील हे देखील एकनाथ शिंदेंसोबत गेल्याची दृश्यं समोर आली आहेत. या बंडानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्यात आली आहेत. यामध्ये दोन दिवसांपूर्वी दादर माहिमचे विधानसभेचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना भवनासमोर आंदोलन केलं होतं. मात्र आता तेच आता गुवाहाटीत दाखल झाले आहेत.

सकाळी काही माध्यमांनी भाजपच्या ऑफरची बातमी झळकावली आणि आसामला जाणारी विमानं वाढली:
भाजपने कोणताही अधिकृत वक्तव्य केलेलं नसताना आज सकाळी काही टीव्ही वृत्तवाहिन्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला किती कॅबिनेट पद आणि राज्यमंत्री पद मिळणार अशा बातम्या झळकवल्या होत्या. त्यानंतर आसामला जाणाऱ्या मुंबईतील आमदारांच्या विमान फेऱ्या वाढल्या आहेत. त्यानंतर समाज माध्यमांवर प्रसार माध्यमांच्या भूमिकेवर आणि काही माध्यमाचा देखील सरकार पाडण्यात हात आहे का अशी चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Few Media stand on Eknath Shinde’s political stand check details 23 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x