3 May 2025 3:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Brand Rahul Gandhi | मोदींना 10 वर्षात जमलं नाही! पण 'राहुल है तो ही मुमकिन है!' कर्नाटकला दिलेली आश्वासने पुढील 1-2 तासात पूर्ण होणार

Rahul Gandhi

Brand Rahul Gandhi | एकाबाजूला मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासनं देऊन सत्तेत आलं आहे. त्यात महागाई कमी करणे, प्रति वर्ष २ कोटी लोकांना रोजगार देणे आणि भ्रष्टाचार कमी करणे असे आणि इतर अनेक वचन जनतेला दिली होती. मात्र मोदी पंतप्रधान पदी सलग १० वर्ष विराजमान होऊनही जनतेसाठी परिस्थिती अजून कठीण झाल्याचं पाहायला मिळतंय.

२०१४ पासून आजपर्यंत महागाईने तर कळस गाठलाय, बेरोजगारी वेगाने वाढते आहे, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं सोडाच उलट शेतकऱ्यांची अवस्था अजून बिकट झाली आहे. मात्र आता पुढील निवडणुकीपूर्वी लोकांना दिलेली वचन पुन्हा प्रकाशझोतात येऊ नयेत म्हणून देव-धर्म आणि जातीच्या नावावर विषय उकरून जनतेच्या मूळ मुद्यांना दुर्लक्षित करून सत्तेत पुन्हा येण्याची येण्याची योजना आखली जातं आहे का असंच वातावरण आहे. मात्र कर्नाटकातील जनता शहाणी झाल्याचं पाहायला मिळतंय. दुसरीकडे, वचन देणं आणि त्याच पालन करण्यात राहुल गांधी सच्चे सिद्ध झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यासाठी त्यांनी वेळ दिला आहे केवळ १-२ तासांचा.

आज कर्नाटकात सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्याशिवाय आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

पाचही आश्वासने येत्या एक-दोन तासात पूर्ण होतील
शपथविधी नंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थितांना संबोधित केले. काँग्रेस पक्षाने निवडणुकीदरम्यान दिलेली पाचही आश्वासने येत्या एक-दोन तासात पूर्ण केली जातील, अशी घोषणा त्यांनी याच व्यासपीठावरून केली. त्याचबरोबर आपल्या ‘भारत जोडो यात्रे’चा उल्लेख करताना ते म्हणाले की, यात आम्ही द्वेष नष्ट केला आणि प्रेम जिंकले. द्वेषाच्या बाजारात कर्नाटकने लाखो प्रेमाची दुकाने उघडली आहेत.

आम्ही खोटी आश्वासने देत नाही
राहुल गांधी यांनी व्यासपीठावरून घोषणा केली की, आम्ही तुम्हाला 5 आश्वासने दिली होती. मी म्हणालो की आम्ही खोटी आश्वासने देत नाही. आम्ही जे म्हणतो ते करतो. कर्नाटक सरकारची पहिली कॅबिनेट बैठक 1-2 तासात होणार असून त्या बैठकीत ही 5 आश्वासने कायद्यात रूपांतरित होतील.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “मी कर्नाटकच्या जनतेचे मनापासून आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने आभार मानतो. तुम्ही काँग्रेसपक्षाला पूर्ण पाठिंबा दिला. गेल्या पाच वर्षांत तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले हे तुम्हाला आणि मला माहित आहे. ही निवडणूक काँग्रेस पक्षाने का जिंकली, असे माध्यमांमध्ये लिहिले होते. या विजयाचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे काँग्रेस कर्नाटकातील गरीब, मागास, दलितांच्या पाठीशी उभी राहिली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News title: Five promises made to people of Karnataka will be fulfilled in next 1 2 hours said Rahul Gandhi check details on 20 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या