29 May 2023 11:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा पॉवर शेअर मजबूत तेजीत, नवीन टार्गेट प्राईस जाहीर, परतावा पाहून गुंतवणूक करा ICRA Share Price | ICRA शेअर्स गुंतवणुकदारांना मिळणार 1300 टक्क्यांचा भरघोस डिव्हीडंड, फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड तारीख पाहा Rekha Jhunjhunwala Portfolio | स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स शेअर्सने रेखा झुनझुनवाला यांची जोरदार कमाई, स्टॉक डिटल्स पहा Manipur Violence | अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा जातीय हिंसाचार, आतापर्यंत 79 जणांचा मृत्यू, आमदार-मंत्र्यांच्या घरावर हल्ले 50 Percent Commission | मोदींनी इव्हेन्ट केलेल्या मध्य प्रदेश उज्जैन 'महाकाल लोक' येथील महादेवाचे ६ पुतळे कोसळले, कॉट्रॅक्टर गुजरातचा निघाला Credit Card Reward Points | क्रेडिट कार्डवर तुमच्याकडून वर्षाला 10 हजार रुपये वसूल केले जातात, तुम्हाला ही ट्रिक माहित आहे? Property Knowledge | प्रॉपर्टी विकताना फक्त एवढीच रक्कम कॅशमध्ये घ्या, नाहीतर ही चूक किती महागात पडेल लक्षात घ्या
x

Satish Uke | फडणवीसांच्या भावांनी धमकावल्याचं म्हणत सतिश उके कोर्टात रडले | कोर्टात धक्कादायक माहिती दिली

Satish Uke

मुंबई, 02 एप्रिल | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतिश उके यांना काल ईडीने अटक केली आहे. जमीन गैरव्यवहार प्रकरणी सतिश उके (Satish Uke) यांना अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या अटकेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

Nagpur-based lawyer Satish Uke and his brother were arrested by the ED on Thursday, sparking a statewide outcry :

नागपूरच्या आर्थिक गुन्हे शाखेत दाखल गुन्ह्याची दखल ईडीने घेतली :
बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन खरेदी प्रकरणात नागपूरच्या आर्थिक गुन्हे शाखेत दाखल असलेल्या गुन्ह्याची दखल घेत ईडीने ही कारवाई केली आहे. दरम्यान सतिश उके आणि त्यांच्या भावाला ईडीने काल मुंबईत PMLA कोर्टासमोर सादर केलं. दिवसभर चाललेल्या युक्तीवादानंतर कोर्टाने सतिश उके आणि त्यांच्या भावाला ६ एप्रिलपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

फडणवीसांच्या भावांनी मला धमकावलं :
काल झालेल्या सुनावणीमध्ये सतिश उके यांनी स्वतः आपली बाजू मांडत फडणवीसांच्या भावांनी मला धमकावल्याचं कोर्टाला सांगितलं. इतकच नव्हे तर या सुनावणीदरम्यान उके कोर्टात रडले देखील. उके बंधूंना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर ईडीकडून या प्रकरणाची माहिती न्यायालयात देण्यात आली. नागपूरमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेत दोन गुन्हे नोंदवले गेले आहेत. खैरूनिसा शेख या महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्यावर त्या महिलेवर दबाव टाकून महिलेच्या पतीने उकेंशी व्यवहार केला हे मान्य करण्यास सांगितले. यांसह विविध प्रकरणात आरोपीची कोठडी मिळून तपासाची गरज असल्याचा युक्तीवाद ईडीच्या वकीलांनी न्यायालयात केला.

ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह :
सतिश उके यांच्याकडून नंतर वकील रवी जाधव यांनी कोर्टासमोर बाजू मांडली. यावेळी त्यांनी ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. उके हे व्यवसायाने वकील आहेत. अटकेनंतर उकेंना २४ तासात कोर्टात हजार करणे गरजेचे असताना ईडीने तसे केले नाही. जी कायदेशीर प्रक्रिया आहे ते ईडीचे अधिकारी पाळत नाहीत. अटकेचा मेमोही अद्याप दिलेला नसल्याचा युक्तीवाद जाधव यांनी केला.

जस्टीस लोया केस मध्ये दबाव टाकल्याचं म्हटलं :
कोर्टासमोर आपली बाजू मांडताना सतिश उके यांनी, “घरात मी झोपेत असताना बेडरूम मध्ये सीआरपीएफचे जवान AK 47 बंदूक घेऊन आले. माझे वडील आजारी आहेत. मी आधी आर्किटेक्ट होतो नंतर कायद्याचं शिक्षण घेऊन २००७ साली वकिली सुरू केली. मी फडणवीस आणि गडकरी यांच्या विरोधात खटले लढले आहे. माझ्यावर लोया यांच्या केस मध्ये दबाव टाकला गेला. मला फडणवीस यांच्या भावाकडून धमकावण्यात आलं होतं”, असं कोर्टाला सांगितलं. यावेळी युक्तीवाद करताना उके यांना न्यायालयात रडू कोसळले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Lawyer Satish Uke and his brother were arrested by the ED on Thursday 02 April 2022.

हॅशटॅग्स

#Satish Uke(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x