1 October 2023 4:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी स्टॉक तेजीत वाढतोय, मोठ्या कॉन्ट्रॅक्टचा पाऊस, आता परताव्याचा पाऊस? Mufin Green Share Price | कमाल झाली! मुफिन ग्रीन फायनान्स शेअरने एका दिवसात 9.99% परतावा दिला, लवकरच मल्टिबॅगर परतावा? Gujarat Alkalies Share Price | मालामाल मल्टिबॅगर शेअर! गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स शेअरने अल्पावधीत दिला 300% परतावा Stocks To Buy | टॉप 5 शेअर्स गुंतवणुकीसाठी सेव्ह करून ठेवा, अल्पावधीत हे शेअर्स 36 टक्के पर्यंत परतावा देतील Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 01 ऑक्टोबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया शेअरने तब्बल 3970 टक्के परतावा दिला, ऑर्डर्सबुक मजबूत, फायदा घ्या Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीला मिळाला सर्वात मोठा कॉन्ट्रॅक्ट, शेअर्स तेजीच्या संकेताने खरेदी वाढली
x

Loksabha Election | भाजपमध्ये पडद्याआड हालचाली वाढल्या, लोकसभा निवडणूक 2023 मध्येच घेण्याची तयारी? मोदी-शहांची चिंता का वाढतेय?

Loksabha Election 2023

Loksabha Election | देशाच्या हिंदी भाषिक पट्ट्यातील मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका या वर्षी होणार आहेत. याशिवाय पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार असून त्यासोबतच आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्येही निवडणुका होणार आहेत.

मात्र दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राहुल गांधींच्या वाढत्या प्रभावाने मोदी, शहा आणि नड्डा यांची चिंता वाढल्याचं वृत्त आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा पार्ट २ केल्यास भाजपचा मोठा पराभव होईल असं म्हटलं जातंय आणि त्यामुळे भारत जोडो यात्रा पार्ट २ होण्यापूर्वीच लोकसभा निवडणूक घेतली जावी असं मत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केल्याची देखील माहिती आहे. तसेच आगामी ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीतील आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्येही भाजप सत्तेत येणं अशक्य आहे, तर दुसऱ्या बाजूला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये सुद्धा काँग्रेसची सत्ता येईल असे संकेत भाजप आणि आरएसएसच्या सर्व्हेसहित निरनिरळ्या वृत्त वाहिन्यांच्या सर्व्हेतही समोर येतं असल्याने भाजपाची चिंता वाढली आहे.

तसे झाल्यास विरोधकांचा आणि विशेष करून काँग्रेसचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल
तसे झाल्यास विरोधकांचा आणि विशेष करून काँग्रेसचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक मोदींच्या राजकीय पतनाची ठरेल असं देखील भाजपाला वाटत आहे. त्यामुळे या डिसेंबर पूर्वीच लोकसभा विसर्जित करता येईल का याची चाचपणी सुरू आहे अशी माहिती दिल्लीतील भाजपच्या अंतर्गत गोटातून पुढे आली आहे.

विधानसभा निवडणुकीबरोबरच लोकसभा निवडणुकीचे नियोजन
त्यामुळे चिंतेत असलेल्या मोदी-शहांनी तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीबरोबरच लोकसभा निवडणुकीचे ही नियोजन करण्यात येत असून त्याचा आराखडा राज्यनिहाय तयार केला जात आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगालसह सर्वच राज्यांमध्ये भाजपला वेगवेगळी रणनीती आखून लोकसभा निवडणुकीत उतरायचे आहे. यापूर्वी हा आराखडा तयार करण्यासाठी दिल्लीत मंथन सुरू आहे. एकाबाजूला विरोधकांकडे प्रचारासाठी दिग्गज नेत्यांच्या फौज असतील तर देशातील संपूर्ण भाजप ही राजकीय दृष्ट्या ढळमळीत झालेल्या मोदी ब्रँडच्या भरोसे असतील असं चित्र आहे.

मोदींच्या रॅली आणि रोड शो झाले १८ पैकी १३ विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांच्या दारुण पराभव
त्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे कर्नाटकातील ज्या १८ मतदारसंघात मोदींच्या रॅली आणि रोड शो झाले त्यापैकी १३ विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांच्या दारुण पराभव झाला आहे. त्यात महागाई आणि बेरोजगारीने उच्चांक गाठल्याने जनतेच्या मनात प्रचंड असंतोष आहे आणि परिणामी भाजपची प्रचाराची सर्व भिस्त ही धामिर्क मुद्द्यांच्या भरोसे आहे आणि त्यामुळेच धामिर्क द्वेष वाढेल अशाच मुद्द्यांना भाजप नेते पुढे करत आहेत आणि तसेच त्यांना आदेश देण्यात आल्याचं वृत्त आहे.

राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबतही चर्चा
मंगलवारी गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि संगठन महासचिव बीएल संतोष यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत अनेक राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबतही चर्चा झाली. इतकंच नाही तर संघटनेबाहेर काम करणाऱ्या अनेक नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देऊन त्यांना निवडणुकीत आणण्याची चर्चा आहे.

दरम्यान, शुक्रवारी दिल्लीत बैठक झाली. जेपी नड्डा यांनी या बैठकीत पक्षाच्या सरचिटणीसांची बैठक घेतली. इतकंच नाही तर पक्षाने आपल्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना 11 जूनला निमंत्रित केलं आहे. प्रत्येक राज्याचा अहवाल घेतला जाईल आणि त्यानंतर तेथील निवडणुकीची तयारी कशी करायची याचा विचार केला जाईल, असे मानले जात आहे. एकाबाजूला भाजप सर्वच राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली असताना दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाच्या संबधित राज्यस्तरीय प्रशासकीय बैठका देखील वाढल्याने भाजप लोकसभा निवडणूक २०२३ मध्येच घेईल याचे संकेत मिळत आहेत. अन्यथा २०२४ मध्ये परिस्थिती भाजपसह मोदी-शहांच्या हाताबाहेर जाईल असे संकेत भाजपाला मिळाले आहेत आणि त्यानंतर राज्यपातळीवर कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पहिल्या टप्प्यात पक्ष ५१ सभा आणि ४००० हून अधिक टिफिन चर्चा सभा
त्यापूर्वी बुधवारी जेपी नड्डा यूपीतील नोएडा येथील एका टिफिन मीटिंगमध्ये सामील झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात पक्ष ५१ सभा आणि ४००० हून अधिक टिफिन चर्चा सभा घेणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. या माध्यमातून पक्ष रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, टिफिन बैठकीदरम्यान सभापतींनी कार्यकर्त्यांना जमिनीवर काम करण्यास सांगितले. टिफिन मीटिंगसारख्या कार्यक्रमांची मदत होईल. जेपी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना शिस्त पाळण्याचा सल्ला देत एकतेचा संदेश दिला.

सत्ता जाण्याचे संकेत मिळताच कार्यकर्त्यांना नम्रतेने वागण्याचे आवाहन
जे. पी. नड्डा यांनी अनेक शेतकरी आंदोलने, महिलांचे प्रश्न अशा मुद्द्यांवर कार्यकर्त्यांशी नम्रतेने वागण्यास सांगितले. जेपी नड्डा म्हणाले की, जेव्हा तुम्ही जनतेत जाल तेव्हा अनेक लोक काही मुद्द्यांना धरून कडाडून विरोध करू शकतात, कारण महागाई आणि बेरोजगारी हे मुद्दे आपल्या विरोधात आहेत हे देखील ते कार्यकर्त्यांना पटवून देतं आहेत. आपण त्या लोकांना नम्रपणे उत्तर दिले पाहिजे आणि पक्षाचा बचाव केला पाहिजे. भाजप समाजाच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या प्रश्नांसाठी काम करत आहे, हे त्यांना समजावून सांगा आणि कोणाशीही आक्रमक पणे बोलू नका. विशेष म्हणजे अंतर्गत सर्व्हेत भाजपसाठी लोकसभेच्या १६० जागा जिंकणं अवघड असल्याचं समोर आल्याने भाजपच्या वरिष्ठांची चिंता वाढली आहे.

News Title : Loksabha Election 2023 check details on 09 June 2023.

हॅशटॅग्स

#Loksabha Election 2023(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x