20 August 2022 11:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Finance Tips | आपली आर्थिक परिस्थिती कशी सुधारावी, संकटकाळासाठी आपत्कालीन निधी कसा तयार करावा? Multibagger Stocks | असा जबरदस्त स्टॉक निवडा, 92 रुपयाच्या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 4.5 कोटी केले, स्टॉकबद्दल जाणून घ्या Credit Card Benefits | प्रत्येक वेळी खरेदी करताना तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड का वापरावे, जाणून घ्या 10 मोठे फायदे EPFO Money Alert | नोकरदारांनी या चुका केल्यास बंद होईल तुमचं ईपीएफ खातं, जाणून घ्या ईपीएफओचे महत्त्वाचे नियम Viral Video | होमवर्क पासून सुटकेचा जबरदस्त उपाय, चिमुकल्याने सुरु केली टिचरची स्तुती, मजेदार व्हिडिओ व्हायरल NEFT Transactions Fee | बँकेच्या ब्रान्चमधून एनईएफटीचा वापर महागणार? आरबीआयचा 25 रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव SEBI Shares Sell Rule | शेअर्सच्या विक्रीसाठी 14 नोव्हेंबरपासून ब्लॉक यंत्रणा लागू होणार, जाणून घ्या कसं काम करणार
x

Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास भाजपाचा पॉलिटिकल प्लॅन तयार

Maharashtra Political Crisis

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंसह जवळपास ३८ ते ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानं राजकीय वादळ निर्माण झालं आहे. दिवसेंदिवस दोन्ही बाजूंनी आक्रमक भूमिका घेतल्या जात असल्याचं दिसत आहे. शिवसेनेनं १६ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केलीये. यावरूनच आता हे बंड सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचलं आहे. एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर आज सुनावणी होणार आहे.

अविश्वास प्रस्तावासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात :
एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने विधानसभा उपाध्यक्षांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचबरोबर विधानसभा उपाध्यक्षांनी सदस्यत्व रद्द करण्याबद्दल जारी करण्यात आलेल्या नोटिशीलाही आव्हान देण्यात आलं आहे. दुसरीकडे भाजपने त्यांच्या पॉलिटिकल प्लॅन तयार केल्याचं वृत्त आहे.

भाजपाचा पॉलिटिकल प्लॅन तयार :
राज्यात सुरू असलेल्या या सर्व राजकीय घडामोडीवर भाजपाचा लक्ष आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी भाजपा शासित राज्यात सध्या मुक्काम ठोकला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या सक्रीय झाले असून त्यांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही लागला तरी भाजपाचा प्लॅन तयार आहे.

‘शिंदे पॅटर्न’ने पोटनिवडणूक लढवणार :
मध्य प्रदेशात काँग्रेस आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर कमलनाथ सरकार कोसळलं. महाराष्ट्रातही शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना हाताशी धरत हाच ‘शिंदे पॅटर्न’ भाजपा राबवण्याची शक्यता आहे. या आमदारांनी राजीनामा दिल्यास महाविकास आघाडी सरकार अल्पमतामध्ये येईल आणि विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकणार नाही. त्याचा फायदा घेत भाजपा सरकार बनवण्याचा दावा करेल. राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये जास्तीत जास्त बंडखोर आमदार विजयी करण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra Political Crisis after Eknath Shinde rebel against Shivsena check details 27 June 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x