14 December 2024 3:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Eknath Shinde | शिंदे विरोधी शिवसेना नेत्यांना रेडिसन ब्यू हॉटेलने बुकिंग नाकारले | तर आसामचे मंत्री राजकीय भेटींसाठी हॉटेलवर

Eknath Shinde

Eknath Shinde | शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेपुढे मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी वारंवार बंडखोरांना महाराष्ट्रात येण्याचे आवाहन केले आहे. आताही राऊत यांनी ‘कब तक छिपोंगे गोहाती में..’ असं म्हणत शिंदे गटाची खिल्ली उडवली आहे.

शहाजी पाटील यांचा संवाद :
काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ती हाटील एकदम ओकेच..असं म्हणत शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी सोशल मीडियावर एकच धुरळा उडवून दिला आहे. शहाजी पाटील यांची ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यांच्याच वक्तव्याचा धागा पकडून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांना टोला लगावला आहे.

शिवसेनेपुढे मोठा राजकीय पेच :
शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेपुढे मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. एकीकडे शिवसेनेनं बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे, शिंदे यांनी भाजपकडे धाव घेतली आहे. मध्यरात्री आसामच्या एका मंत्र्याने हॉटेलमध्ये जाऊन शिंदेंची भेट घेतली.

आसामचे मंत्री अशोक सिंघल शिंदेंच्या भेटीला :
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता पाच दिवस उलटले आहे. पण सोपी वाटलेली लढाई आता कायदेशीर पेचात अडकली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा गुवाहाटीमध्ये मुक्काम वाढला आहे. रविवारी मध्यरात्री उशिरा आसामचे मंत्री अशोक सिंघल यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे वृत्त एनआयएन वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Assam ministers reached to Hotel to met Eknath Shinde check details 26 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x