4 May 2025 11:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC
x

दाऊदच्या नावाने बोंबाबोंब करून मुंबईकरांना महागाई, बेरोजगारीवरून विचलित करायचं | निवडणुकीत हिंदू-मुस्लिम फूट पाडायची

Mumbai BJP Morcha

मुंबई, 09 मार्च | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. ठाकरे सरकारने नवाब मलिक यांचा राजीनामा त्वरित घ्यावा, या मागणीसाठी मुंबई आज विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. आधी भायखळा इथून आझाद मैदानाकडे निघणार होता.

मात्र याला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर हा मोर्चा आता आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा होणार आहे. या मोर्चासाठी आझाद मैदानात एक मोठे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. याचबरोबर शेकडो खुर्च्या आणि बॅनर्स या ठिकाणी लावण्यात आले आहेत. फक्त आझाद मैदान नाही तर संपूर्ण मुंबईभर असे शेकडो बॅनर्स भाजपने लावले आहेत. साडे दहा वाजताच्या दरम्यान या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात होणार होती.

केंद्राशी संबंधित महागाई आणि बेरोजगारीचा भडका आणि मुंबई महानगर पालिका निवडणूक :
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पेट्रोल-डिझेलचे दर प्रचंड वाढले आणि परिणामी मोठ्या प्रमाणावर महागाई देखील वाढली आहे. त्यात रशिया-युक्रेन युद्धाने भर टाकल्याने मोदी सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच कोरोनामुळे वाढलेली बेरोजगारी हे मुंबईकरांसाठी गंभीर विषय बनले आहेत. त्यामुळे या सर्व रोजच्या प्रश्नांपासून मुंबईकरांना विचलित करून आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीत दाऊदच्या नावाने बोंबाबोंब करून हिंदू-मुस्लिम फूट पाडायची अशी भाजपची योजना असल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे भाजपच्या या राजकीय ट्रॅपमध्ये सामान्य मुंबईकर अडकणार की तो महागाई आणि बेरोजगारीवरून मोदी सरकारला जाब विचारणार ते पाहावं लागणार आहे.

५ वर्ष मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना फडणवीस शांत राहिले :
सध्या फडणवीस मंत्री नवाब मलिक यांच्या नावाने राजकीय कांगावा करत असले तरी ते महाविकास आघाडी सरकार येण्यापूर्वी ५ वर्ष राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देखील होते. मात्र संपूर्ण कार्यकाळात त्यांनी या विषयावर चकार शब्द देखील काढल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे फडणवीसांचा हेतू देखील राजकीय संशय वाढवणारा आहे असंच म्हणावं लागेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mumbai BJP Morcha over Nawab Malik resignation.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या