4 May 2025 12:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

अस्तित्वात नसलेल्या फेक गुजरात मॉडेलची पावसाने पोलखोल | रस्त्यापासून घरापर्यंत लोकं कमरेभर पाण्यात | 63 जणांना मृत्यू

Rain effect in Gujarat

Gujarat Rain | देशातील हवामानाचे पॅटर्न बदलले आहेत. सोमवारी गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि इतर अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाचा जनजीवनावर परिणाम झाला. गुजरातमध्ये गेल्या 24 तासांत पाऊस आणि पुरामुळे 63 जणांना आपला जीव गमवावा लागला. पावसामुळे नुकसान झालेल्या 10 हजारहून अधिक लोकांना सरकारने सुरक्षित स्थळी हलवलं आहे. 8 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सरकारी कर्मचारीही अडकून पडले :
गुजरातमध्ये अंबिका नदीला आलेल्या पुरामुळे आजूबाजूच्या इमारतीतील सरकारी कर्मचारीही अडकून पडले होते. त्यानंतर वलसाडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय तटरक्षक दलाला माहिती देऊन मदत मागितली. आयसीजीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, चेतक हेलिकॉप्टरद्वारे ही कारवाई करण्यात आली. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे काही प्रमाणात त्रास झाला, मात्र 16 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वलसाड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 12 जुलै रोजी सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अमित शहा यांचं गुजरातमधील पुराबाबत ट्विट :
गुजरात सरकारने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सोमवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत झालेल्या पावसामुळे 10,700 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातमधील पुराबाबत ट्विट करत म्हटले आहे की, “गुजरातच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीच्या संदर्भात मी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल जी यांच्याशी बोललो आणि मोदी सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. गुजरात प्रशासन, एसडीआरएफ आणि एनडीआरएफ बाधितांना त्वरित मदत पुरवण्यात गुंतले आहेत.

अहमदाबादमध्ये आज पहाटे 5 वाजल्यापासून पाऊस थांबला आहे. पण रात्री उशिरा पावसाने अडचणीत भर घातली. सायंकाळी सहा ते पहाटे पाच या वेळेत सुमारे ४५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे इथल्या दिखाऊ पायाभूत सुविधांची देखील थोड्या पावसाने पोलखोल केली आहे. कारण रस्ते आणि इमारतीतील घरात असलेलं लोकं सुद्धा कमरेभर पाण्यात अडकलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वात नसलेल्या ‘राजकीय गुजरात मॉडेलची’पोलखोल निसर्गाने केली असल्याची टीका समाज माध्यमांवर सुरु झाली आहे. स्थानिक वाहिन्या इथलं वास्तव उघड करत आहेत. त्यामुळे मोदी सरकारची मोठी अडचण झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Rain effect in Gujarat check details here 12 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rain effect in Gujarat(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या