30 April 2024 8:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

बारसू रिफायनरी आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज, शिंदेंनी 70% लोकांच्या समर्थनाचा आकडा स्वतःच जाहीर करून टाकला?

Ratnagiri Barsu Protesters

Lathi Charge at Barsu | कोकणात शिंदे-फडणवीस सरकारची प्रचंड दडपशाही सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. शिंदे सरकारमधील शिंदे समर्थक कोकणातील मंत्र्यांना तर कोकणी लोकांच्या जीवाशी आणि निर्सार्गाशी काहीही देणं घेणंच नसल्याचं पाहायला मिळतंय. आज पुन्हा शिंदे सरकारच्या पोलिसांनी कोकणी आंदोलक जनतेवर लाठीचार्ज केल्याचं समोर आलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी स्वतःच समर्थनाचा आकडा जाहीर केला
मी स्वतः उद्योग मंत्र्यांशी बोललोय. माझी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासोबत चर्चा झाली. सध्या तिथे शांतता असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा लाठीचार्ज झाला नाही, अशा प्रकारची माहिती मला कलेक्टर आणि सिपीने दिलेली आहे. हे सर्व आमचे भूमिपुत्र आहेत. त्यांच्या इच्छेविरुद्ध कुठलाही प्रकल्प आणून त्यांच्यावर अन्याय करायचा नाही. 70 टक्के शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला पाठिंबा आहे”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.

आता बारसू रिफायनरी प्रोजेक्टचा वाद आणखी चिघळला आहे. सर्वेक्षण करण्यासाठी आलेले कर्मचारी आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट झाली, तसंच पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोपही केला जात आहे. दरम्यान, सकाळीच ठाकरे गटाचे स्थानिक खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

बारसू रिफानरी प्रकल्पासाठी मातीचे सर्वेक्षण सुरु असताना आता दुपारी मोठ्या प्रमाणावर आंदोलक सर्वेक्षणाच्या ठिकाणी दाखल झाले होते.यामध्ये महिला,पुरुष आणि तरूणांचा समावेश होता. पोलिस आणि आंदोलक एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे काही वेळापुर्वीचे दृष्य होते. या आंदोलकांना घटनास्थळावरून हटविण्यासाठी पोलीसांचा मोठा फौजफाटा देखील होता.या पोलिसांनी आंदोलकांना घटनास्थळावरून हटवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रूधुरांचा वापर केला होता. या लाठीचार्ज आणि अश्रूधुरांच्या आंदोलकांवरील वापरानंतर वातावरण चांगलेच तापले होते.

ठाकरे गटाने स्थानिकांना पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे बारसू येथे आंदोलकांची भेट घेण्यासाठी निघालेल्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहेत. गेल्या अनेक तासांपासून राऊत आणि कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशध्यक्ष, सोलापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Ratnagiri lathi charge on Barsu protesters serious allegations against police and state government check details on 28 April 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x