12 December 2024 9:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

खळबळ! दाऊदशी संबंधित व्यक्ती म्हणून आरोप असलेले डॉ. लांबे यांची नियुक्ती फडणवीसांनीच सप्टेंबर २०१९ मध्ये केलेली

Sana Malik

मुंबई, 14 मार्च | देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात एक पेन ड्राईव्ह सादर करून डॉ. लांबे यांची पोलखोल केली. या पेन ड्राईव्हमध्ये दोन पात्रं आहेत. मोहम्मद अर्शद खान आणि डॉ. मुदीस्सर लांबे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नेमलं ते मुदस्सीर लांबे हेच आहेत. 31 डिसेंबर 2020 ला त्यांच्या विरोधात एका 33 वर्षीय सामाजिक कार्यकर्तीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला तेव्हा लांबेने लग्न करण्याची तयारी दाखवली आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकी या महिलेला दिली, असं फडणवीसांनी सांगितलं.

Dr. Lambe was appointed a Waqf Board member by Fadnavis/BJP govt on 13 Sept 2019. MahavikasAghadi govt was established in November 2019 :

अर्शद खान अटकेत आहे. त्याचा मोबाईल जप्त करा. त्यात या दोघांचेही संवाद असून दाऊदबाबतच्या त्यांच्या संबंधाचा त्यात खुलासा आहे. हे संभाषण डिलीट करण्याआधी मोबाईल ताब्यात घ्या, असं सांगतानाच चक्क दाऊदची माणसं तुम्ही वक्फ बोर्डावर नियुक्त केली. अर्थसंकल्पात काही गोष्टी कमी जास्त होतील. पण बॉम्ब स्फोटात असलेल्यांना वक्फ बोर्डावर घेणं कितपत योग्य आहे, असा सवाल फडणवीसांनी केला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक (Sana Malik) यांनी ट्विटद्वारे उत्तर दिलं आहे. सना मलिक यांनी मुदस्सीर लांबे हे वक्फ बोर्डात कधी दाखल झाले याची तारीख समोर आणली आहे. याशिवाय त्यांनी मुदस्सीर लांबे यांचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो ट्विट केला आहे.

सना मलिक यांनी ट्विटरवर दिलेली माहिती आणि दावा :
अर्धसत्य हे पूर्ण खोट असतं. डॉ. लांबे यांचीन नियुक्ती देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपच्या सरकारच्या काळात नियुक्ती झाली होती, असं सना मलिक यांनी म्हटलं आहे. फडणवीसांनी ती नियुक्ती १३ सप्टेंबर २०१९ मध्ये केली होती आणि महाविकास आघाडी सरकार नोव्हेंबर 2019 मध्ये आलं होतं. माझ्या वडिलांकडे अल्पसंख्यांक आणि वक्फ विभाग जानेवारी 2020 मध्ये आले आहेत. देवेंद्र फडणवीस हे डी गँगच्या नातेवाईकांच्या आणि बलात्काराचा आरोप असणाऱ्या व्यक्तीसोबत असल्याचा दावा सना मलिक केला. सना मलिक यांनी देवेंद्र फडणवीस आणि डॉ. लांबे यांचा फोटो ट्विट केला आहे.

सना मलिक यांचं नेमकं ट्विट काय?

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sana Malik tweet Devendra Fadnavis photo with Muddasir Lambe.

 

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x