13 December 2024 7:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

रविवारी कोर्ट बंद असतं | संध्याकाळी 6.30 वाजता शिंदे गटाची केस सुप्रीम कोर्टात | 7.30 ठरलं उद्या सुनावणी | नेटिझन्सच्या दिलासा चर्चा

Supreme Court

Eknath Shinde | एकनाथ शिंदे आणि शिवसेना वाद आता सुप्रीम कोर्टात गेला आहे. एकनाथ शिंदे गटाने उपसभापतींच्या अपात्रतेच्या सूचनेवर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उपसभापतींनी जारी केलेली अपात्रता नोटीस आणि अजय चौधरी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती यांना आव्हान देणाऱ्या दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या दोन्ही याचिकेची प्रत महाराष्ट्र सरकारच्या वकिलांना पाठवण्यात आली आहे. या प्रकरणावर उद्या तातडीने सुनावणी घेण्यात येणार आहे.

‘या’ तीन प्रकरणावर शिंदे गटाने घेतला आक्षेप :
1. शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी अजय चौधरी यांची नियुक्ती आणि उपसभापतींविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळण्याला शिंदे गटाने आव्हान दिले आहे.
2. उपसभापतींच्या अविश्वास प्रस्तावावर निर्णय होईपर्यंत त्यांच्याविरुद्ध अपात्रतेच्या याचिकेवर कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश उपसभापतींना द्यावेत, अशी मागणी शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे.
3. महाराष्ट्र सरकारला बंडखोरांच्या कुटुंबाला सुरक्षा देण्याचे निर्देश द्यावेत.

रविवारी सुद्धा काम?
रविवारी कोर्ट बंद . संध्याकाळी 6.30 वाजता एकनाथ शिंदेंचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आलं. संध्याकाळी 7.30 वाजता न्यायाधीश उद्या सकाळी या खटल्याची सुनावणी करतील असं ठरलं. सर्वोच्च न्यायालयात जेथे ७३ हजार खटले प्रलंबित आहेत आणि अनेक वेळा केस बनवणाऱ्याचा मृत्यू होतो, तिथे अशा प्रकारे सुपरसॉनिक पद्धतीने काम होतं असल्याने समाज माध्यमांवर याचिकेची कागदपत्र दाखवत जोरदार चर्चा रंगली आहे. देशातील टीव्ही वृत्त वाहिन्या आणि राष्ट्रीय वाहिन्या केवळ बघ्याच्या भूमिकेत आहेत हे देखील अधोरेखित होतंय. अजूनही अनेक आमदार आणि मंत्री गुवाहाटीला जात आहेत आणि त्यात याच ‘भावी दिलासा’ मुद्यावरून बंडखोरी करणाऱ्यांना निर्धास्त करण्यात येतं आहे असं समजतंय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Supreme Court will here Eknath Shinde group plea by tomorrow check details 26 June 2022.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x