19 April 2024 11:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

मुलांवर लक्ष ठेवा | लोखंडी शिडीला वीजेच्या तारा | खेळताना स्पर्श होताच मुलगा भस्मसात

A 12 year-old boy, Died, electrocuted, Airoli

नवी मुंबई, २३ फेब्रुवारी: मुंबईतील ऐरोली परिसरात एका 12 वर्षीय मुलाचा वीजेच्या धक्क्यानंतर जळून मृत्यू झाला आहे. हा मुलगा रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या एका लोखंडी शिडीला स्पर्श करत होता. तर ती शिडी रस्त्यावरच असलेल्या वीजेच्या तारांना स्पर्श झाली. स्पर्श होताच आगीचा भडका उडाला आणि तो मुलगा जळून जागीच मृत्यूमुखी पावला.

मुलाची ओळख अद्याप पटली नाही:
ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. शिडी हायव्होल्टेज तारांना भिडली होती आणि अवघ्या काही सेकंदांमध्ये त्या मुलाच्या शरीराने पेट घेतला. स्थानिक पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक योगेश गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या मुलाची ओळख अद्याप पटलेली नाही. कदाचित तो त्याच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर राहत असावा. ही घटना सोमवारच्या (22 फेब्रुवारी) सकाळची आहे. ऐरोलीच्या सेक्टर 7 मध्ये सकाळी 8.52 वाजता शिवशंकर प्लाजा 2 मध्ये एका दुकानासमोर घडली. याच दुकानातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

लोखंडी शिडी आलीच कशी?
योगेश गावडे यांनी सांगितले, की “संबंधित मुलाच्या कुटुंबियांचा अद्याप काहीच पत्ता नाही. त्याच्या कुटुंबियांचा सध्या शोध घेतला जात आहे. सोबतच ती लोखंडी शिडी त्या ठिकाणी कुणी आणि का ठेवली याचा देखील तपास केला जात आहे. त्यामध्ये निष्काळजीपणा दिसून आल्यास त्याचा देखील तपास केला जाईल.” सामाजिक कार्यकर्ते बापू पोळ यांनी सांगितल्याप्रमाणे, मृत्यूमुखी पावलेला मुलगा फुटपाथवरील सिग्नलजवळ खेळणी विकायचा. घनटनास्थळी लोखंडी शिडी ठेवणे हा सरळ-सरळ निष्काळजीपणा आहे. त्यातूनच त्या निष्पाप मुलाचा बळी गेला. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

महावितरणचे स्पष्टीकरण:
मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीकडून या घटनेवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यानुसार, 21 फेब्रुवारी रोजी दीवा गावातील दीवा फीडर येथील एका दुकानासमोर लोखंडी शिडी ठेवली होती. कुणी तरी ती शिडी लोटून वीजेच्या तारांजळ नेली. त्या तारांमधून 11KV ची वीज प्रवाहित होत होती. 22 फेब्रुवारीच्या सकाळी दीवा फीडर ट्रिप झाले. पीडित मुलाने त्या शिडीच्या खांबाला पकडले आणि त्याने रबरी चप्पलही घातलेली नाही. त्यामुळे त्या मुलाला वीजेचा जोरदार झटका बसला.

 

News English Summary: A 12-year-old boy has died after being electrocuted in the Airoli area of Navi Mumbai. The boy was touching an iron ladder placed on the side of the road. So the ladder touched the power lines on the road. As soon as it was touched, a fire broke out and the boy was burnt to death on the spot.

News English Title: A 12 year-old boy has died after being electrocuted in the Airoli area of Navi Mumbai news updates.

हॅशटॅग्स

#Accident(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x