26 May 2022 8:39 PM
अँप डाउनलोड

शिवसेना खासदार संजय राऊत बेळगाव पोलिसांच्या ताब्यात

Belgaum, belgaon, Karnataka, Shivsena MP Sanjay Raut

बेळगाव : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संजय राऊत यांची आज बेळगावात प्रकट मुलाखत होत आहे. त्या कार्यक्रमासाठी संजय राऊत दुपारी तीनच्या सुमारास मुंबईवरुन बेळगाव विमानतळावर दाखल झाले. विमानतळावरुन पोलिसांनी त्यांना आपल्या गाडीत बसवलं. पोलिस संरक्षणात संजय राऊतांना कार्यक्रमस्थळी नेण्यात येत असल्याचं सुरुवातीला जाणवलं. मात्र पोलिसांच्या गाडीत कार्यक्रमाचे आयोजक कोणीच नव्हते. बेळगाव पोलीस हे संजय राऊतांना घेऊन कोल्हापूरच्या दिशेने निघाले.

तत्पूर्वी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे बेळगावमध्ये पोहोचले होते. प्रगट मुलाखतीच्या कार्यक्रमासाठी संजय राऊत बेळगावमध्ये आले होते. विमानतळावर त्यांना बेळगाव पोलिसांनी रोखलं होतं. विमानतळावरील केबिनमध्ये पोलिसांबरोबर चर्चा करुन राऊत बाहेर पडले. कालपर्यंत पोलिसांनी संजय राऊत यांच्या बेळगाव दौऱ्यातील कार्यक्रमांना परवानगी दिली नव्हती. पण आज सकाळी काही नियम व अटींसह त्यांच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली होती.

काल कडेकोट बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांना चकवा देत राज्याचे सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बेळगावात सीमा लढय़ातील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. बेळगावपर्यंतच्या प्रवासात चकवा देण्यात यशस्वी ठरलेल्या यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडले. प्रतिबंधात्मक आदेशाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांचे कडे भेदून पुन्हा एकदा शिवसेनेने यड्रावकरांच्या रूपाने बेळगावात धाव घेतली. दरम्यान, बेळगावसह सीमाभागात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.

 

Web Title:  Belgaum Police took action on Shivsena MP Sanjay Raut.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(255)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x