नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे कोणता नेता कधी नेमकं कोणतं धक्कादायक विधान करून जाईल याची शास्वती देता येणार नाही. याआधीच मोदी शहांना विष्णूचा अवतार, रामाचा अवतार आणि बरंच काही बोलून झालेलं रोज एक ना एक नेता नवनवीन विधान करून मोदींची स्तुती करत असतात. मात्र आता स्तुतीच्या नादात मोदींचा आपल्याकडून अपमान केला जातं आहे याचे भानही या नेत्यांना नसल्याचे दिसते.

तसाच काहीसा प्रकार भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महसचिव आणि खासदार कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी त्यांनी अनेकदा मोदींचे गुणगान केले आहे, मात्र यावेळी त्याच गुणगान करण्याच्या नादात मोदींची खिल्ली उडवली गेल्याच त्यांच्या ध्यानात देखील आलं नाही हे विशेष म्हणावे लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीच त्यांनी एक धक्कादायक विधान केले आहे आणि त्यानंतर त्यांची समाज माध्यमांवर चर्चा रंगली आहे. ड्रग्जची नशा करू नये असे सांगताना विजयवर्गीय यांनी उपस्थित युवकांना देशभक्तीचे धडे दिले. युवकांनी देशभक्तीच्या नशेत राहवे. परंतु, देशभक्तीची नशा एवढी ही नसावी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे लग्नच नाही करायचे. विजयवर्गीय यांचे हे वक्तव्य मोदींवर टीका आहे की, त्यांची खिल्ली उडविण्याचा प्रकार ते त्यांच्या देखील लक्षात आलं नसल्याचं दिसतं आहे. किंबहुना त्यांना मोदींच्या त्या खाजगी आयुष्याबद्दल काही माहित आहे किंवा नाही असे प्रश्न समाज माध्यमांवर विचारले जाऊ लागले आहेत.

त्यापूर्वी त्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांविषयी धक्कादायक वक्तव्य केले होते. इंदोरमध्ये संघाचे पदाधिकारी नसते तर इंदोरला आग लावली असती, असं ते म्हणाले होते. त्याच्या या वक्तव्यावर सर्वस्तरातून टीका झाली होती.

 

Web Title:  BJP Senior Leader Kailash Vijayvargiya made strange statement.

देशभक्तीची नशा एवढी करू नका की मोदीं प्रमाणे लग्नच नाही करायचे: भाजप खा. विजयवर्गीय