2 July 2020 8:01 PM
अँप डाउनलोड

तेलंगणा राज्य काँग्रेसमुक्तीच्या दिशेने; १९ पैकी १२ आमदारांचा गट टीआरएसमध्ये विलिन

Telangana, Telangana Rashtra Samithi

हैदराबाद : लोकसभा निवडणुकीत देशभर मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्याचा परिणाम आता इतर राज्यांत दिसू लागला आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना पक्षात राहणे देखील धोक्याचे वाटू लागले असून सत्ताधारी पक्षामध्ये जाण्यासाठी स्पर्धा सूर झाली आहे. सत्तेत असलेल्या चंद्रशेखर राव यांच्या पक्षात काँग्रेस विधीमंडळ पक्ष विलिन करण्याचे पत्रच १२ आमदारांनी दिले आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

तेलंगणामध्ये के चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीची सत्ता असून त्यांच्याकडे १२० पैकी ९१ जागांचे बहुमत आहे. तर एमआयएम ७ आणि काँग्रेसचे १९ आमदार आहेत. काँग्रेसच्या १९ पैकी १२ आमदारांनी विधानसभा अध्यक्ष पोचराम श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे जाऊन काँगेस विधीसंमडळ पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये विलिन करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

काँग्रेस प्रदेश समितीनेही नुकतेच आमदार रोहित रेड्डी हे राजीनामा देणार असल्याचे म्हटले होते. तसेच टीआरएस पक्षात जातील असे म्हटले होते. रेड्डी यांचे गेल्या वर्षी काँग्रेस पक्षात सहभागी झाल्यानंतर टीआरएसने निलंबन केले होते. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या १२ आमदारांनी विलिनीकरणाचे पत्र दिल्याने आता काँग्रेसकडे ६ आमदारांचे संख्याबळ राहिले आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Congress(371)#Rahul Gandhi(157)#TRS(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x