28 June 2022 12:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
नागपूर-बुटीबोरी मार्गावर 6 पदरी उड्डाणपूल | 15 मिनिटांत 19 किमीचं अंतर कापता येईल - नितीन गडकरी एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदारांना या 'गेम प्लॅन' पासून ठेवलंय अंधारात | शिंदे आणि भाजपचा गेम प्लॅन बाहेर येतोय Multibagger Penny Stocks | हा 3 रुपयांचा पेनी शेअर करतोय मालामाल | आजही खरेदीला खूप स्वस्त Inflation Effect | पीठानंतर आता तांदूळ अजून महागणार आहे | तुमच्या किचनचा खर्च वाढणार Multibagger Stocks | तुम्ही सुद्धा असे शेअर निवडा | या शेअरने फक्त 10 महिन्यात 960 टक्के परतावा दिला Demat Deactivated | तुमचे डीमॅट खाते डिऍक्टिव्हेट होईल | फक्त 3 दिवस उरले | हे काम लवकर करा PPF Investment | मुलाच्या नावेही उघडता येईल पीपीएफ खाते | फायद्याच्या योजनेबद्दल जाणून घ्या
x

कॉपी-पेस्ट याचिका! ईडीने देशातील नागरिकांना या पद्धतीची वागणूक देणे योग्य नव्हे: सुप्रीम कोर्ट

dk shivakumar, Congress, ED Notice

नवी दिल्ली: मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेसचे नेते डी.के.शिवकुमार हे सध्या जामिनावर बाहेर आहेत. यादरम्यान शुक्रवारी ईडीनं सुप्रीम कोर्टात (Supreme Court of India) एक याचिका दाखल करून शिवकुमार यांच्या जामिनाला विरोध केला. परंतु यादरम्यान ईडीनं एक मोठी चुक केली. ईडीनं या प्रकरणी माजी गृहमंत्री पी.चिदंबरम (INX Media Case P Chidambaram) यांच्या प्रकरणात दाखल केलेली याचिकाच कॉपी पेस्ट केली. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचं या मुद्द्यावर लक्ष गेल्यानंतर त्यांनी ईडीची (Enforcement Department) ही याचिका फेटाळून लावली.

ईडीने आपल्या अधिकाऱ्यांना न्यायालयाचा निकाल वाचण्यास सांगावे, आमचा निकाल सहज घेऊ नका, असे सुप्रीम कोर्टाने बजावले. देशातील नागरिकांना अशा पद्धतीची वागणूक देणे योग्य नव्हे, असेही न्यायालयाने म्हटले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले जात आहे, त्या पद्धतीने शिवकुमार (Congress Leader DK Shivkumar) प्रकरण हाताळले जात आहे. ‘हे कॉपी-पेस्ट केले आहे आणि त्यात बदलही करण्यात आलेला नाही,’ असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले.

आज सकाळीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेत्या अंबिका सोनी (Congress Leader Ambika Soni) उपस्थित होत्या. दरम्यान, मागील सप्टेंबर महिन्यात डी. के. शिवकुमार यांना सक्तवसुली संचालनालयाने आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी अटक केली आहे. त्यांच्या अटकेवरून कर्नाटकातील राजकीय वातावरण तापले होते. २०१७ मध्ये डी. के शिवकुमार यांच्या निकटवर्तीयांच्या दिल्लीतील निवासस्थानांवर आयकर विभागाने छापे टाकले होते. या छाप्यात ८ कोटी ५९ लाखांची बेकायदा रक्कम आढळून आली होती.

आम्हाला ट्विटरवर फॉलो करा

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x