3 May 2025 6:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK
x

कोरोनाचा चिंताजनक रेकॉर्ड; गेल्या २४ तासांत तब्बल १०,९५६ नवे रुग्ण

Corona Virus, Covid 19, India

नवी दिल्ली, १२ जून: कोरोना व्हायरसने भारतात हाहाकार माजवला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. आज सकाळी ९ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत भारतात तब्बल १० हजार ९५६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या वाढीसह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ९७ हजार ५३५ वर पोहोचली आहे. तर काल गेल्या २४ तासांत ३९६ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. त्यामुळे देशातील कोरोनाबळींची संख्या ८ हजार ४९८ इतकी झाली आहे.

दरम्यान, पहिल्यांदाच देशात एका दिवसात दहा हजाराहून रुग्ण आढळले आहेत. भारतात एकूण १ लाख ४७ हजार १९५ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर १ लाख ४१ हजार ८४२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

भारतात हळहळू लॉकडाउन शिथिल करण्यात येत असला, तरी वाढत चालेल्या रुग्णांच्या संख्येमुळे चिंतेत भर पडत आहे. त्यामुळे लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय हानिकारक ठरण्याची शक्यता आहे. एका संस्थेनं केलेल्या अभ्यासातून भारतासाची काळजीत भर टाकणारे निष्कर्ष समोर आले आहे. जपानस्थित सुरक्षेसंबंधित नोमुरा संस्थेनं कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर देशातील 45 अर्थव्यवस्थांचा अभ्यास केला आहे. यात भारत ‘डेंजर झोन’मध्ये (धोकायदायक श्रेणी) असल्याचं म्हटलं आहे. भारतात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती असून, लॉकडाउन लागू होऊ शकतो, असं नोमुरानं म्हटलं आहे.

 

News English Summary: Corona virus is rampant in India. The number of corona victims in the country has reached the threshold of three lakh. As many as 10,956 new cases have been reported in India in the last 24 hours, according to figures released at 9 am today.

News English Title: CoronaVirus Marathi News highest single day spike 10956 new cases News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या